अवजड वाहतुकीमुळे पिंजाळ नदीवरील पूल धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 02:53 AM2018-12-27T02:53:54+5:302018-12-27T02:54:09+5:30

वर्सोवा पुलाच्या दुरु स्तीच्या कामामुळे गुजरातकडून मुंबईला जाणारी अहमदाबाद-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मनोर -वाडा-भिवंडी या राज्यमहामार्गावर वळविण्यात आली आहे.

Due to heavy traffic, the Pinnacle River pool is dangerous | अवजड वाहतुकीमुळे पिंजाळ नदीवरील पूल धोकादायक

अवजड वाहतुकीमुळे पिंजाळ नदीवरील पूल धोकादायक

Next

वाडा : वर्सोवा पुलाच्या दुरु स्तीच्या कामामुळे गुजरातकडून मुंबईला जाणारी अहमदाबाद-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मनोर -वाडा-भिवंडी या राज्यमहामार्गावर वळविण्यात आली आहे. या महामार्गावरील पिंजाळी नदीवर असलेला जुना पुल धोकादायक असताना आता पुलावरु न मोठ्या संख्येने अवजड वाहतूक वाढल्याने हा धोका वाढला आहे.

मुंबई, न्हावाशेवा या बंदराकडे दररोज ४० ते ६० मेट्रिक टनाचे सामान घेऊन जाणारे शेकडो ट्रेलर व अन्य अवजड वाहने या राज्य महामार्गावरील पाली येथे असलेल्या पिंजाळ नदीवरील धोकादायक पुलावरु न जात आहेत. या अवजड वाहतुकीमुळे या पुलाचा धोका अधिक वाढला असून या पुला नजिक नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे अपुर्ण काम तातडीने पुर्ण करु न नविन पुलावरु न वाहतूक सुरु करावी अशी मागणी वाडा तालुक्यातील प्रवाशांकडून केली जात आहे.

वाडा शहरापासुन अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर वाडा-मनोर या राज्य महामार्गावर पिंजाळी नदीवर सुमारे ८५ वर्षापुर्वी बांधलेला हा ब्रिटिश कालीन पुल आहे. दुहेरी वाहतुकीसाठी असलेल्या या जुन्या पुलाची तात्पुरती डागडुजीची मलमपट्टी सार्वजनिक बांधकाम खात्याने अनेक वेळा करु न हा पुल वाहतुकीस (अवजड वाहना व्यतिरिक्त) सुरु ठेवला आहे. पण या राज्य महामार्गावर मुंबई-अहमदाबाद या महामार्गाची वाहतूक वळविल्यापासुन गेले पंधरा दिवस या पुलावरु न दररोज शेकडो वाहने ये-जा करु लागल्याने हे पुल अधिक धोकादायक बनले आहे.

या पुलाच्या दोन्ही कडेच्या संरक्षक भिंतीवर लहान, मोठी अनेक झाडे उगवली आहेत. या झाडांच्या मुळांनी हा पुल कमकुवत बनविला आहे. हा पुल फक्त दुहेरी वाहतुकीसाठी असल्याने एकाच वेळी या पुलावर १० ते १५ अवजड वाहनांची कोंडीही होते. अशा वेळी या पुलाचा धोका खुप वाढलेला असतो.

सा.बां.चे दुर्लक्ष

घोडबंदर रोडजवळील वर्सोवा पुलाचे दुरु स्तीचे काम हाती घेतल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक मनोर -वाडा-भिवंडी या राज्य महामार्गावरु न वळविण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.

या राज्य महामार्गाचे चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने या पुलानजिक पर्यायी पुल बांधलेले आहे. या पुलाच्या दोन्ही बाजुकडील भरवाचे काम गेल्या चार वर्षांपासून अपुरे असल्याने या नविन पुलावरु न वाहतूक सुरु होऊ शकलेली नाही.

Web Title: Due to heavy traffic, the Pinnacle River pool is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.