मंदीच्या तडाख्याने नाताळाचा हंगामही कोरडाच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 02:25 AM2018-12-28T02:25:33+5:302018-12-28T02:26:49+5:30

दक्षिण कोकणात पर्यटकांचा ओघ आहे, तर उत्तर कोकणातील पर्यटन केंद्रांना पर्यटकांची प्रतीक्षा आहे.

 The Christmas season is also dry | मंदीच्या तडाख्याने नाताळाचा हंगामही कोरडाच

मंदीच्या तडाख्याने नाताळाचा हंगामही कोरडाच

googlenewsNext

बोर्डी : दक्षिण कोकणात पर्यटकांचा ओघ आहे, तर उत्तर कोकणातील पर्यटन केंद्रांना पर्यटकांची प्रतीक्षा आहे. हा विरोधाभास योगायोग नाही, तर येथील पायाभूत सुविधा आणि शासकीय धोरण आडवे येत असल्याची प्रतिक्रि या या उद्योगाशी संबंधितांनी लोकमतशी बोलताना दिली. तर ऐन हंगामात मासे गावत नसल्याने आर्थिक संकट ओढवल्याची चिंता कोळिंनींनी व्यक्त केली.
कधी नव्हे एवढी मंदी नाताळच्या हंगामात अनुभवली. मात्र, वर्षा अखेर आणि नवीन वर्षाच्या स्वागताला हे चित्र बदलायला हवे असा आशावाद येथील व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. येथील पारनाका, आगर, नरपड, चिखले, घोलवड आणि बोर्डीतील चौपाट्यांवर सुविधांचा अभाव आहे. किनाऱ्यावर भटकंती करून आल्यावर शौचालय, चेंजिंगरूम नाहीत. बहुतेक ग्रामपंचायतिनी ग्रामस्वच्छता पुरस्कार पटकावला आहे. मात्र, चौपाटीवर शौचाला बसणाºयांची संख्या कमी झालेली नाही अशी तक्र ार परगावतील पर्यटकांनाकडून केली जाते असे एका रेस्टोरंट मालकाने बोलताना सांगितले. रात्री उजेडाची सोय नसल्याने सरक्षिततेची भीती त्यांना सतावते.
मेरिटाईम बोर्डातर्फे राबवले जाणारे निर्मल सागरतट अभियानही सप्शेल फ्लॉप ठरले असून निधी अभावी अर्धवट कामं झालेली आहेत. या भागात सहज दमण दारू उपलब्ध होत असल्याने, बार कसा चालवावा हा प्रश्न या व्यवसायिकांना पडला आहे. हे चित्र बदलणे आवश्यक आहे. मात्र बार्डी येथील निवस्थानाची दुर्दशा झाल्याने मागील ४ ते ५ वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे निवासाची सोय होत नसल्याने बहुतेक पर्यटक पाठ फिरवतात. त्याचा फटका स्टॉलधारकांना बसतो आहे. तर माशांचा तुटवडा असून पापलेट आणि अन्य मासेच उपलब्ध नाहीत त्यामुळे ऐन हंगामात आर्थिक फटका बसल्याचे आगर आणि झाई या मच्छीमार केंद्रातील कोळिंनींनी सांगितले.
३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या स्वागताला जे मोजके बुकिंग झाले आहे. त्यांना जेवण पुरवणार आहेत. येथे येणारा पर्यटक मद्याला प्राधान्य देत हे स्थळ निवडत नाही. तर येथील ग्रामीण ढंगाचे जेवण आणि माशांचे विविध पदार्थ आदींची मागणी करतो. त्यामुळे गावठी सुकं चिकन, चिंच घालून बनविलेले मटण, पाटीया फिश फ्राय तसेच पारसी पद्धतीचे धानसाक, पत्रानी मच्छी आदि पदार्थ बनविणार असल्याचे हिलझील हॉटेलचे शेफ सुंदर डोंगरकर म्हणाला. तर सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताला येणाºया पर्यटकांना येथील चिकू वाईनची चव अनुभवायला मिळेल अशी माहिती जगातील पिहल्या चिकू वाईनरीची मालक प्रियंका सावे यांनी दिली.

दालचिनी, आलं आणि मध या फ्लेवरची ग्रीन गार्डन नावाची या थंडीच्या हंगामाकरिता स्पेशल अशी चिकू वाइन या मौसमात घेऊन आले आहे. त्याची चव नक्कीच पर्यटकांना आवडेल. मात्र या हंगामात पर्यटक रोडवले आहेत.
- प्रियंका सावे, मालक, जगातील पहिली चिकू वायनरी

मत्स्य दुष्काळाचे संकट आहे. पापलेट, घोळ, दाढा असे आर्थिक मूल्य मिळवून देणारे मासे बाजारात उपलब्ध नाहीत. मच्छीमार आर्थिक कोंडीत सापडला आहे
- उषा माच्छी, (कोळी)
झाई मच्छी बाजार

Web Title:  The Christmas season is also dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.