विवस्त्र फोटो काढून सहकाऱ्यांनी केलं ब्लॅकमेलिंग, युवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 09:25 PM2019-05-06T21:25:22+5:302019-05-06T21:32:46+5:30

वाणगाव येथील घटना 

Blackmail made by collins, taking away his nude photo, youth's suicide in palghar | विवस्त्र फोटो काढून सहकाऱ्यांनी केलं ब्लॅकमेलिंग, युवकाची आत्महत्या

विवस्त्र फोटो काढून सहकाऱ्यांनी केलं ब्लॅकमेलिंग, युवकाची आत्महत्या

googlenewsNext

डहाणू/बोर्डी - वाणगाव रेल्वे स्टेशनपाडा येथे राहणाऱ्या 24 वर्षीय राहुल मिश्रा या युवकाची दोन सहकाऱ्यांनी विवस्त्र चित्रफीत करून त्या बदल्यात पैशाची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास बदनामीची धमकी दिल्याने या त्रासाला कंटाळून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत वाणगाव पोलीस ठाण्यात त्याच्या भावाने फिर्याद दाखल केली आहे. 

मृत झालेला तरुण राहुल हा बोईसर येथील औद्योगिक वसाहतीच्या आरती ड्रग्स या कंपनीत कामाला होता. यावेळी तो अन्य दोन सहकाऱ्यांसह शिवाजीनगर येथे भाड्याचा फ्लॅट घेऊन राहायचा. तेथे पार्टी करून तो झोपल्यानंतर त्यांनी त्याला विवस्त्र करून मोबाईलद्वारे फोटो व चित्रीकरण केले. ते डिलीट करण्याच्या बदल्यात पैशांची मागणी करून ती पूर्ण न केल्यास सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी दिली. मात्र,  पैशांची पूर्तता करण्यास असमर्थ ठरल्याने त्याने भीतीपोटी वाणगाव येथे रविवार 5 मे रोजी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतचे फोटो, मेसेज आणि कॉल रेकॉर्डिंग त्याच्या मोबाईलमधून मिळाले. त्यानंतर हा प्रकार लक्षात येताच त्याच्या भावाने हा पुरावा वाणगाव पोलीस ठाण्यात सादर करून फिर्याद दाखल केली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.
 

Web Title: Blackmail made by collins, taking away his nude photo, youth's suicide in palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.