अर्नाळा समुद्रात बुडून तरुण, तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 12:31 AM2019-07-17T00:31:37+5:302019-07-17T00:31:43+5:30

भिवंडी येथून १६ तरुण तरुणींचा ग्रुप विरार पश्चिमेकडील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर रविवारी संध्याकाळी आला होता.

Arnala sinks in the sea, the death of the young woman | अर्नाळा समुद्रात बुडून तरुण, तरुणीचा मृत्यू

अर्नाळा समुद्रात बुडून तरुण, तरुणीचा मृत्यू

Next

नालासोपारा : भिवंडी येथून १६ तरुण तरुणींचा ग्रुप विरार पश्चिमेकडील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर रविवारी संध्याकाळी आला होता. त्यामधील २ तरुणी आणि १ तरुण समुद्रात आंघोळीसाठी गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे अर्नाळा पोलीस आणि सागरी सुरक्षा रक्षकांनी दोन तरुणींना वाचवून समुद्राच्या बाहेर काढले तर बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सोमवारी दुपारी पोलिसांना सापडला आहे. यामध्ये तरु ण आणि तरु णीचा मृत्यू झाला असून दुसरी तरु णी रुग्णालयात उपचार घेत आहे.
मध्यप्रदेशातील जबलपूर येथून १८ ते २८ वयोगटातील ८ तरु ण आणि ८ तरु णी असा एकूण १६ जणांचा ग्रुप भिवंडी येथे आला होता. समुद्र किनाºयाचा फेरफटका मारण्यासाठी व धमाल मस्ती करण्यासाठी तो रविवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अर्नाळा समुद्रकिनारी पोहचला. साडे पाच वाजण्याच्या सुमारास दोन तरु णी एक तरु णासोबत अंघोळ करण्यासाठी समुद्रात उतरल्या. खोलीचा आणि पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले होते.

Web Title: Arnala sinks in the sea, the death of the young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.