मीटरला बगल देत रिक्षाचालकांची मनमानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:35 PM2019-03-28T23:35:09+5:302019-03-28T23:35:20+5:30
वसई विरारमध्ये पश्चिमेला सर्वत्र रिक्षा चालकांचा मनमानी कारभार चालत असल्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. मीटरचे पालन न करणे, हवे तसे पैसे मागणे हे रिक्षा चालकांचे रोजचे काम झाल्याने नागरिकांना प्रवास करण्यात अडचणी जाणवत आहेत.
विरार : वसई विरारमध्ये पश्चिमेला सर्वत्र रिक्षा चालकांचा मनमानी कारभार चालत असल्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. मीटरचे पालन न करणे, हवे तसे पैसे मागणे हे रिक्षा चालकांचे रोजचे काम झाल्याने नागरिकांना प्रवास करण्यात अडचणी जाणवत आहेत.
वसई विरार मध्ये पश्चिम भागात पर्यटक स्थळे असल्याने बाहेरून मोठ्या प्रमाणात पर्यटक याठिकाणी फिरण्यासाठी येत असतात. बाहेरच्या नागरिकांची ज्याप्रकारे फसवणूक केली जाते त्याचं प्रकारे स्थानिक रहिवाशांना देखील फसवले जात आहे. शहरात सर्वत्र मीटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, रिक्षा चालक त्याचे पालन करत नाही. त्यांच्याकडून ठराविक भाडं ठरवले जाते व त्या ठिकाणी तितकेच भाडं घेतलं जातं. अंतर कमी व भाडं जास्त अशी पद्धत सुरु असल्याने नागरिक हैराण आहेत.
इतकेच नाही तर रिक्षा चालकांना मीटर वापरण्यास सांगितले की, ते करणे देतात. मीटरची वायर उंदराने खाल्ली, मीटर मध्ये पाणी गेले, मीटर खराब आहे. यासारखे करणे देऊन विषय टाळला जातो. ‘‘ पाच ते दहा मिनिटांच्या अंतरासाठी ४० रु पये घेतले जातात. अंबाडी रोड येथे शेअरिंग घेत नाहीत आणि कोणी शेरिंगमध्ये जायचं प्रयत्न केला तर रिक्षा चालक त्याला उतरवतात. ७० ते ८० रु पये मागू लागतात.
येथील स्थानिक जगदीश केळशीकर यांनी असे म्हणतात की, एखाद्या नागरिकाने या विरोधात आवाज उठवला तर त्याचाशी भांडायला रिक्षा चालक गॅँगकरुन येतात. अनेकदा शेअरिंगच्या पद्धतीत देखील अशा प्रकारची अरेरावी केली जाते. १० रु पयाच्या शेअरिंग मध्ये ३५ रु पये मागितले जातात व नागरिकांची लुट होते. ‘‘ वसई स्थानक ते ओम नगर स्पेशल भाडे ३५ रु पये घेतले जाते. हे अंतर एक किलोमीटर देखील नाही. मीटर कधीच चालू नसतो आणि असल्यास २० रु पये भाडं आकारले जाते. त्याठिकाणी रिक्षा चालक ४० रु पये घेतात. रिक्षा चालक त्यांच्या होशोबाने भाडं ठरवत असल्याने नागरीकांना प्रवास म्हणजे भुर्दंड ठरत आहे.
रिक्षा चालाकंची लुट थांबावी यासाठी आर.टी.ओ यांनी मीटरची सुविधा सुरु केली मात्र, रिक्षा चालकांचा मनमानी कारभार सुरूच आहे. या विरोधात तक्र ार नोंदवण्यास नागरिक गेल्या नंतर त्यांना राजकीय पक्षांची भीती घातली जाते. आरटीओने याविरोधात मोहीम सुरु केली आहे. याचे गांभिर्य देखिल मस्तवाल रिक्षा चालकांना नाही. नागरिकांची लुट होत असली तरी रिक्षा चालक न सुधारण्याची भाषा करत असल्याने हा पेच अधिक वाढला आहे.
मीटरची सुविधा सगळीकडे देण्यात आली आहे. हे असे प्रकार थांबावे यासाठीचे हे मीटर देण्यात आले आहेत. जर कोणीही रिक्षा चालक त्याच्या वापर करत नसेल किंवा मनमानी करत असेल तर त्यावर आम्ही नक्कीच कारवाई करू. दांडतात्मक कारवाई करण्यात येईल व त्याचं बरोबर त्याचा परवाना देखील काही नियमित काळासाठी रद्द करण्यात येईल.
- अनिल पाटील,
आरटीओ अधिकारी