वर्धा-नागपूर मार्गावर कंटेनर व टँकरची समोरासमोर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 11:55 IST2017-10-31T11:53:42+5:302017-10-31T11:55:48+5:30
वर्ध्याकडून नागपूरकडे जाणारा एच.पी. गॅसचा टंँकर क्र.एम.एच ४३-बी जी-२४०८ हा नागपूरकडून वर्ध्याकडे जाणाºया एम.एच ४० ए टी २५६८ क्रमांकाच्या कंटेनरला पवनारजवळच्या पुलावर धडकला.

वर्धा-नागपूर मार्गावर कंटेनर व टँकरची समोरासमोर धडक
आॅनलाईन लोकमत
वर्धा- वर्ध्याकडून नागपूरकडे जाणारा एच.पी. गॅसचा टंँकर क्र.एम.एच ४३-बी जी-२४०८ हा नागपूरकडून वर्ध्याकडे जाणाऱ्या एम.एच ४० ए टी २५६८ क्रमांकाच्या कंटेनरला पवनारजवळच्या पुलावर धडकला. ही घटना सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली.
या कंटेनरमध्ये लोखंडी सळया भरलेल्या होत्या. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. एच.पी. गॅसचा टंँकरही रिकामाच होता अन्यथा फार मोठी दुर्घटना घडली असती. दोन्ही गाड्यांचे ड्रायव्हर घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती. स्थानिकांच्या मदतीने वाहतूक सुरळित करण्यात आली. पुढील तपास सेवाग्राम पोलीस करीत आहेत.