विहिरीत युवकाचा मृतदेह आढळला, परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 14:37 IST2019-01-26T14:36:32+5:302019-01-26T14:37:13+5:30
आकोली ते आंजी मोठी मार्गावर पारधी बेड्याजवळील एका विहिरीत युवकाचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळून आला. त्याच्या खिशातील पाकिटात सापडलेल्या कागदपत्रांवरून युवकाची ओळख पटली आहे. शेख आशिफ शेख मोहम्मद (वय ४१ वर्ष) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

विहिरीत युवकाचा मृतदेह आढळला, परिसरात खळबळ
आकोली - आकोली ते आंजी मोठी मार्गावर पारधी बेड्याजवळील एका विहिरीत युवकाचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळून आला. त्याच्या खिशातील पाकिटात सापडलेल्या कागदपत्रांवरून युवकाची ओळख पटली आहे. शेख आशिफ शेख मोहम्मद (वय ४१ वर्ष) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा खंडवा (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहे. पारधी बेड्याजवळच्या अजाब सोडे यांच्या शेतात रस्त्याशेजारी विहीर आहे. येथून ये-जा करणाऱ्यांना नागरिकांना दुर्गंधी परसल्याचे लक्षात आले. यामागील कारण शोधले असता त्यांना विहिरीमध्ये मृतदेह असल्याचे उघडकीस आले.
पोलीस पाटील सुरेश गडकर यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला. शोध घेतला असता त्यांना मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांच्या खिशात बँकेचे पासबुक, एटीएम कार्ड आढळले. मृत व्यक्ती विवाहित असून दोन वर्षांपूर्वी त्याने आंजी मोठी गाव सोडले. तो खंडवा मध्य प्रदेश येथे राहायला गेला होता.