‘त्या’ आरोग्य सेविकेचे निलंबन मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:34 PM2018-10-29T22:34:50+5:302018-10-29T22:35:10+5:30
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आरोग्य सेविका वंदना ऊईके (सयाम) यांचे निलबंन मागे घेण्याच्या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वात आरोग्य सेविका व सेविकांनी सोमवारी जि.प. कार्यालयासमोर धरणे देऊन जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांना निवेदन सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आरोग्य सेविका वंदना ऊईके (सयाम) यांचे निलबंन मागे घेण्याच्या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वात आरोग्य सेविका व सेविकांनी सोमवारी जि.प. कार्यालयासमोर धरणे देऊन जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांना निवेदन सादर केले. यावेळी सकारात्मक चर्चेअंती योग्य कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी गुल्हाणे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ तेलतुबंडे, जिल्हा सचिव दीपक कांबळे, उपाध्यक्ष विजय जांगळे, सुजाता कांबळे, नलिनी उबदेकर, संजय डफरे, अनुराधा परळीकर यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी आंदोलनादरम्यान जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. जिल्हा परिषद कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात रतन बेंडे, अमित कोपूलवार, विठ्ठल केवटे, ललीता अडसर, गजानन पिसे, विजय वांदिले, सुधाकर कापसे, रंगराव राठोड, राजेंद्र धरमठोक, अविनाश चव्हाण, गजानन थुल, संजय तायडे, सरोज गंधे, उमा चौधरी, दिवाकर अडसड, बाबाराव कनेर यांच्यासह मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते.