हिंगणघाटात एकाच वेळी सहा ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा,  १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 12:01 PM2023-04-26T12:01:59+5:302023-04-26T12:02:33+5:30

वर्धा पोलिसांची मोठी कारवाई

Six online gambling dens raided simultaneously in Hinganghat, cash worth 14.32 lakh seized | हिंगणघाटात एकाच वेळी सहा ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा,  १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगणघाटात एकाच वेळी सहा ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा,  १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext

वर्धा : हिंगणघाट शहरातील सहा ऑनलाइन जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, क्राईम इंटेलिजन्स पथक आणि सायबर सेल पथकाने एकाचवेळी छापा टाकून लॅपटॉपसह इतर साहित्य असा एकूण तब्बल १४ लाख ३२ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत २७ जुगाऱ्यांना अटक केली. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात ऑनलाइन जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या निर्देशान्वये पोलिसांची विविध सहा पथके तयार करून हिंगणघाटमधील आठवडी बाजार, वीर भगतसिंग वॉर्ड, श्रीराम टॉकीज रोड या परिसरात एकाच वेळी छापे मारण्यात आले. दरम्यान, आरोपी हे स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ६ दुकानांमध्ये वेगवेगळया कंपनीच्या जुगाराच्या मशीन लावून तसेच संगणकावर आणि लॅपटॉपवर इंटरनेट व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑनलाइन जुगार व इतर प्रकारचे जुगार खेळताना व खेळविताना मिळून आले.

पोलिसांनी सुमारे सहा दुकानांतून ८ लाख ८० हजार रूपये किमतीच्या ४४ जुगार खेळण्याच्या मशीन, पाच संगणक, एक लॅपटॉप, विविध कंपनीचे ३ लाख १९ हजार रुपयांचे २३ मोबाइल, ५ प्रिंटर आणि ३१ हजार ४७० रूपये रोख रक्कम आणि इतर साहित्य २२ हजार असा एकूण १४ लाख ३२ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या निर्देशात सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, दिनेश बोथकर, विशाल मडावी, रोशन निंबोळकर, अनुप कावळे, सागर भोसले, राकेश इतवारे, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, मंगेश आदे, धीरज राठोड, अभिषेक नाईक, हर्षल सोनटक्के, प्रफुल्ल वानखेडे, स्मिता महाजन यांनी केली.

२७ जुगाऱ्यांना ठोकल्या बेड्या

पोलिसांनी ऑनलाइन पद्धतीने जुगार खेळणाऱ्या राष्ट्रपाल उद्धव भालशंकर, समीर शेख हाफीज शेख, शेख इम्राम शेख इब्राहीम, प्रफुल्ल राजू हेकने, शेख मोहसीन शेख रहीम, संजय सागर खडंतकर, विक्रांत दौलत वावरे, चेतन मोतीराम ढाले, नंदकुमार धनराज रामटेके, शेख राजीक शेख फिरोज, संदीप पद्माकर सरोदे, मुमेर इस्राईल खान, निरज शारदाप्रसाद पाराशर, गजानन रामकृष्ण पर्बत, रोशन सुरेश निमजे, सिद्धार्थ वसंता पथोड, रामा संजय भांडे, लखन बाबाराव कांबळे, शेख नसिम शेख शाबुद्दीन, शेख ताहीर शेख ईब्राहीम, प्रशांत पृथ्वीराज मेश्राम, दीपक अशोक रामटेके, सागर गणेश बैस, गुरुदयालसिंग गुरुबच्चनसिंग भादा, मंगेश सुरेश गुजर, अविनाश मारोतराव नंदागवळी (सर्व रा. हिंगणघाट) यांना अटक केली. तसेच आशिष पाराशर, धीरज पाराशर हे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Six online gambling dens raided simultaneously in Hinganghat, cash worth 14.32 lakh seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.