नारीशक्ती वंदन कायदा स्वागतार्ह; पण तो महिलांची थट्टा करणाराच, योगेंद्र यादव यांची टीका

By महेश सायखेडे | Published: October 2, 2023 03:38 PM2023-10-02T15:38:20+5:302023-10-02T15:39:43+5:30

आरक्षण २०३८ पर्यंत लागू होणे नाहीच

Nari Shakti Vandan Act Welcomed; But he is a mocker of women - Yogendra Yadav's criticism | नारीशक्ती वंदन कायदा स्वागतार्ह; पण तो महिलांची थट्टा करणाराच, योगेंद्र यादव यांची टीका

नारीशक्ती वंदन कायदा स्वागतार्ह; पण तो महिलांची थट्टा करणाराच, योगेंद्र यादव यांची टीका

googlenewsNext

वर्धा : लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे यासाठी मोदी सरकारने आणलेले नारी शक्ती वंदन विधेयक २७ वर्षानंतर आणल्या गेल्याने त्याचे आपण स्वागतच केले. या विधेयकामुळे महिलांना १५ वर्षांसाठी आरक्षण मिळणार असले तरी ते किमान २०३८ पर्यंत तरी लागू होणे शक्य नाही असे चित्र असल्याने हे विधेयक महिलांची थट्टा करणारेच आहे, अशी टीका भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी वर्धा येथे पत्रकारांशी संवाद साधताना केली.

योगेंद्र यादव पुढे म्हणाले, लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे यासाठी केंद्रातील मोदी सरकारने नारी शक्ती वंदन विधेयक आणले. पण याच विधेयकाचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर त्यात प्रामुख्याने तीन त्रुट्या आढळून आल्या आहेत. या विधेयकानुसार महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये १५ वर्षांसाठी आरक्षण मिळणार असून २०२९ मध्ये हे लागू करण्यात येईल असे केंद्रातील मोदी सरकारकडून सांगण्यात येत आहे. पण २०२३ मध्ये भारतील जनगणनेचे आकडेवारी जाहीर होईल.

शिवाय डी-लिमिटेशनची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे याला वेळच लागणार आहे. त्यामुळे आरक्षण लागू व्हायला किमान २०३८ मावळेल. तर आरक्षण कुणाला मिळेल यासह ओबीसी विषयी हे विधेयक मौन आहे. शिवाय आरक्षण कसे देईल, रोटेशन कसे याचीही स्पष्टता नाही असेही यावेळी योगेंद्र यादव यांनी स्पष्ट केले.

२०२४ ची निवडणूक लढणार नाही, केवळ कार्यकर्ता जोडणारभारत जोडोत १५० हून अधिक विविध संघटन एकत्र आले. देश व संविधान वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. पंधरा राज्यात संमेलन व संघटन बांधणी झाली होत आहे. २०२४ च्या निवडणुका आम्ही लढणार नाही. पण कार्यकर्ता जोडून केंद्रातील भाजप-आरएसएसच्या सरकारला हरवण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू. देश व संविधान वाचविण्यासाठी ते आज गरचेचे आहे. जीतेगा इंडिया या अभियानात सव्वा लाखहून अधिक स्वयंसेवक जूळत प्रशिक्षित झाले आहे. त्यांच्यावर सोपविलेल्या कार्यक्षेत्रात ते मोदी सरकारचे खोटेपण उघड करणार आहे. त्याचा प्रतिकात्मक श्रीगणेशा आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्यातून होत आहे.

गांधींची विरासत हडपण्याचा प्रयत्न होत आहे. गांधींची हत्या करणारेच विरासत हडपत आहे. मोदीला हरवण्यासाठी इंडिया गठबंधन गठीत झाले आहे. त्यामुळे भाजपमध्ये खळबळही निर्माण झाली असल्याचे पत्रकार परिषदेत भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रदिप खेलुरकर, अविनाश काकडे, कन्हैया छांगानी, सुधीर पांगुल, सुदाम पवार, प्रवीण काटकर, मजीद कुरेशी आदींची उपस्थिती होती.

Web Title: Nari Shakti Vandan Act Welcomed; But he is a mocker of women - Yogendra Yadav's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.