सिंगापूरपेक्षा उत्तर प्रदेशातील अयोध्येचे तिकीट महाग; दुबई, बॅंकाॅकलाही दरांमध्ये टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 06:17 AM2024-01-11T06:17:54+5:302024-01-11T06:18:44+5:30

विमान तिकिटांनी एकेरी मार्गासाठी २० हजारांचा दर गाठला आहे

Ticket to Ayodhya in Uttar Pradesh is more expensive than Singapore; Dubai, Bangkok were also left behind in rates | सिंगापूरपेक्षा उत्तर प्रदेशातील अयोध्येचे तिकीट महाग; दुबई, बॅंकाॅकलाही दरांमध्ये टाकले मागे

सिंगापूरपेक्षा उत्तर प्रदेशातील अयोध्येचे तिकीट महाग; दुबई, बॅंकाॅकलाही दरांमध्ये टाकले मागे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : येत्या २२ जानेवारीला अयोध्येमध्ये राममंदिरात श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि थेट अयोध्येकरिता विमान सेवा सुरू झाल्यामुळे भाविकांचा, तसेच पर्यटकांचा अयोध्येकडील ओढा वाढला असून, यामुळे तेथील विमान तिकिटांनी एकेरी मार्गासाठी २० हजारांचा दर गाठला आहे. मुंबई ते अयोध्या या एकेरी मार्गावरील दर हे अनेक लोकप्रिय आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांच्या पुढे गेले आहेत.

  • १६,९३७ - मुंबई ते दुबई
  • १३,८०० - मुंबई ते सिंगापूर
  • १६,९३७ - मुंबई ते बँकॉक
  • २०,७०० - मुंबई ते अयोध्या

(किंमत रुपयांमध्ये)

येत्या १९ जानेवारीपासून मुंबई ते अयोध्या (महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ) अशी विमान सेवा इंडिगो कंपनीतर्फे सुरू होणार आहे. या विमानाच्या तिकिटाचे दर २० हजार ७०० रुपयांवर पोहोचले आहेत.

Web Title: Ticket to Ayodhya in Uttar Pradesh is more expensive than Singapore; Dubai, Bangkok were also left behind in rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.