राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेत अखिलेश यादव सहभागी होणार का? सपा नेत्यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 01:16 PM2024-02-19T13:16:00+5:302024-02-19T13:18:48+5:30

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून चर्चा सुरू आहे.

Akhilesh Yadav reacts on whether he will participate in Congress leader Rahul Gandhi's Nyaya Yatra | राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेत अखिलेश यादव सहभागी होणार का? सपा नेत्यांनी स्पष्टच सांगितलं

राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेत अखिलेश यादव सहभागी होणार का? सपा नेत्यांनी स्पष्टच सांगितलं

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमिवर विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची सुरू केली आहे. इंडिया आघाडीत जागावाटपावरुन चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी न्याय याऱत्रा सुरू केली आहे. ही यात्रा आता उत्तर प्रदेशमधून जाणार आहे, या यात्रेत सपा चे नेते अखिलेश यादव सहभागी होणार का अशा चर्चा सुरू आहेत. 

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून वाद सुरू आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार की नाही या चर्चेवर आता खुद्द अखिलेश यादव यांनीच उत्तर दिले आहे. जागावाटपाबाबत निर्णय झाल्यावरच भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत; आपनं सांगितलं कारण...

भारत जोडो न्याय यात्रेबाबत अखिलेश यादव म्हणाले की, काँग्रेससोबत अजूनही चर्चा सुरू आहे. अनेक याद्या तिथून आल्या आणि गेल्याही. ज्या क्षणी जागांचे वाटप होईल, तेव्हाच समाजवादी पक्ष भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होईल.

सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशमध्ये असून ती आज अमेठीत पोहोचणार आहे. पक्षाने अखिलेश यादव यांना यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवले आहे. नुकतेच अखिलेश यादव यांनी यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले नसल्याचे सांगितले होते, त्यानंतर काँग्रेसने निमंत्रण पाठवले होते. अखिलेश या यात्रेत नक्कीच सहभागी होतील, अशी आशा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, उद्या अखिलेश यादवही भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होतील अशी आशा आहे.

सपा आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. समाजवादी पक्ष १७ जागा देण्यास तयार आहे. या जागांची यादी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनाही पाठवण्यात आली आहे, मात्र काँग्रेसने मुरादाबाद विभागात दोन जागांची मागणी केली आहे. काँग्रेस पक्षालाही मुरादाबाद लोकसभेची जागा हवी आहे. गेल्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने ही जागा जिंकली होती. समाजवादी पक्ष कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडण्यास तयार नाही.

Web Title: Akhilesh Yadav reacts on whether he will participate in Congress leader Rahul Gandhi's Nyaya Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.