Teacher's Day 2018: प्रवास असतो सर्वात मोठा शिक्षक, तुम्हाला शिकवतो या ६ गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 11:15 AM2018-09-05T11:15:49+5:302018-09-05T11:18:37+5:30

प्रवासातून नकळत अनेक गोष्टी शिकायला मिळतात ज्या जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोन बदलतात. 

Teacher's Day 2018: Important lesson we learns while travelling | Teacher's Day 2018: प्रवास असतो सर्वात मोठा शिक्षक, तुम्हाला शिकवतो या ६ गोष्टी!

Teacher's Day 2018: प्रवास असतो सर्वात मोठा शिक्षक, तुम्हाला शिकवतो या ६ गोष्टी!

Next

प्रवास करण्याचा प्रत्येकाचा उद्देश वेगळा असतो. आपल्या केवळ आपले गुरुच सगळंकाही शिकवतात असं नाही तर वेगवेगळे अनुभव आणि प्रवासही आपल्याला काहीना काही शिकवत असतात. प्रवासातून नकळत अनेक गोष्टी शिकायला मिळतात ज्या जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोन बदलतात. 

१) सोशल आणि कम्युनिकेशन स्कील वाढवणार

कोणत्याही नव्या शहरात गेल्यानंतर तुम्हाला नवीन लोक भेटतात. सोबतच अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळतात. त्या शहरातील भाषा तुम्हाला येत नसल्याने तुम्ही तुमच्या कम्युनिकेशन स्कीलच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधता. 

२) मनाला शांतता

प्रवास कसाही असो त्याने तुमच्या मनाला शांतता मिळते. शहरातील गोंधळातून दूर एकांतात तुम्ही सर्व समस्या विसरुन जाता. प्रवास तुम्हाला तुमच्या दैनंदिन जगण्यातून वेगळा घेऊन जातो. याने तुम्ही तुमच्या नेहमीच्या समस्यांपासून आणि कंटाळवाण्या लाइफपासून काहीवेळ का होईना दूर जाता. 

३) परिस्थिती हाताळण्याची क्षमता

तुम्ही दुसऱ्या शहरात फिरायला गेल्यास सगळी कामे स्वत: करावी लागतात. काहीही वेळ आली तरी निर्णय स्वत: घ्यावे लागतात. हीच निर्णय घेण्याची क्षमता तुम्हाला गोष्टी मॅनेज करणे शिकवते. प्रवासात शिकलेली ही गोष्टी तुम्ही रिअल लाइफमध्ये वापरु शकता. 

४) आत्मविश्वास वाढतो

प्रवासामुळे तुमच्यातील आत्मविश्वास वाढतो. तुम्हाला तुमच्या कंफर्ट झोनमधून बाहेर आणून काही नवीन करण्याची प्रेरणा देतो. यानेच तुमचा आत्मविश्वास वाढतो. योग्यवेळी योग्य गोष्टींचा निर्णय घेऊन तुम्ही तुमच्यातील आत्मविश्वास वाढवता. 

५) प्रॅक्टिकल जीवन

प्रवास केल्यावर तुम्हाला जगाची खरी माहिती होते. केवळ पुस्ताकातून जग माहीत करुन घेण्यापेक्षा तुम्ही प्रवास करुन जगाच्या जवळ येऊ शकता. नवीन लोक, नवीन ठिकाण तुम्हाला खूपकाही शिकवून जातात. जे तुम्हाला पुस्तकातून शिकायला मिळणार नाही. 

६) स्वत:बाबात मिळते माहिती

प्रवास करताना तुम्हाला केवळ जगाबाबत नाही तर स्वत:बाबतही अनेक नव्या गोष्टी माहिती होता. तुम्ही कोणती स्थिती कशी हॅंडल केली, त्यातून कसे बाहेर आलात, या सगळ्या गोष्टीतून तुम्ही स्वत:बाबत आतून जाणून घेऊ शकता. 

Web Title: Teacher's Day 2018: Important lesson we learns while travelling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक