कमालीचं सुंदर पण प्रकाशझोतात न आलेलं 'पेओरा' हिल स्टेशन, जाणून घ्या खासियत!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 02:30 PM2019-02-09T14:30:45+5:302019-02-09T14:33:18+5:30

उत्तराखंडला देवभूमी म्हटलं जातं. कारण इथे अनेक देवी-देवतांची मंदिरे आहेत. त्यासोबतच उत्तराखंड आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठीही जगभरात लोकप्रिय आहे.

Peora the unexplored beautiful village of Uttarakhand | कमालीचं सुंदर पण प्रकाशझोतात न आलेलं 'पेओरा' हिल स्टेशन, जाणून घ्या खासियत!

कमालीचं सुंदर पण प्रकाशझोतात न आलेलं 'पेओरा' हिल स्टेशन, जाणून घ्या खासियत!

Next

(Image Credit : India Untravelled)

उत्तराखंडला देवभूमी म्हटलं जातं. कारण इथे अनेक देवी-देवतांची मंदिरे आहेत. त्यासोबतच उत्तराखंड आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठीही जगभरात लोकप्रिय आहे. उत्तराखंडमधील लोकप्रिय डेस्टिनेशन्स जसे की, ऑली, चकराता, मसूरी आणि देहरादून सर्वांनाच माहीत आहेत. मात्र इथे अशीही काही ठिकाणे आहेत, ज्यांबाबत फार लोकांना माहीत नाही. असंच एक सुंदर ठिकाण म्हणजे पेओरा.

पेओरा हे हिल्स स्टेशन नैनीताल आणि अल्मोडा दरम्यान येतं. हे हिमालयाच्या उंचच उंच डोंगरांनी आणि घनदाट जंगलांनी वेढलं गेलेलं एक गाव आहे. इथे निसर्गाने केलेली सुंदरतेची बरसात आणि सनसेट बघण्यासारखा असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांनी सजलेलं हे गाव तुम्हाला स्वर्गाचा आनंद देऊ शकतं. पेओरा मुक्तेश्वरपासून ८ किमी अंतरावर आहे.  

(Image Credit : tripoto.com)

उत्तराखंडमधील फळांची टोपली पेओरा

पेओरा हे गाव वेगवेगळ्या फळांसाठी फार लोकप्रिय आहे. लोक येथील ताजी फळे खाण्यासाठी आवर्जून येतात. तसेच येथील अनेक हर्बल प्रॉडक्टसही प्रसिद्ध आहेत. इथे कोणतही लोकल मार्केट नाही किंवा शॉपिंग सेंटर नाही. पण हर्बल प्रॉडक्ट तुम्ही लोकल फॅक्टरीमधून खरेदी करू शकता. 

कधी जाणे योग्य?

पेओराला फिरायला जाण्यासाठी सर्वात चांगला कालावधी मार्च, मे, जून, सप्टेंबर आणि नंतर ऑक्टोबर ते डिसेंबर मानला जातो. जानेवारी ते फेब्रुवारी इथे कडाक्याची थंडी आणि बर्फवृष्टी होत असते. इथे जाण्यासाठी रस्तेही राहत नाहीत. पेओरापासून सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन काठगोदाम हे आहे. हे येथून ७८ किमी अंतरावर आहे. 

(Image Credit : Indiatimes.com)

हे ध्यानात ठेवा

पेओरामध्ये कोणतही मार्केट नसल्याकारणाने बरं होईल की, खाण्यापिण्याच्या वस्तू आणि इतर काही आवश्यक वस्तू सोबत घेऊन जावे. इथे राहण्यासाठी तुम्हाला स्वस्तात घर मिळू शकतं. 

Web Title: Peora the unexplored beautiful village of Uttarakhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.