स्वर्गाहूनही सुंदर असं दमण; जाणं सोपं अन् राहणही स्वस्तात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 04:10 PM2019-05-01T16:10:49+5:302019-05-02T11:22:43+5:30

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अनेक ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहे. याच ट्रॅव्हल डेस्टिनेशनमध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे, दमण. दमण अनेक लोकांसाठी वीकेंड डेस्टिनेशन आहे.

Daman best destination jampore beach lighthouse fort | स्वर्गाहूनही सुंदर असं दमण; जाणं सोपं अन् राहणही स्वस्तात

स्वर्गाहूनही सुंदर असं दमण; जाणं सोपं अन् राहणही स्वस्तात

googlenewsNext

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अनेक ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहे. याच ट्रॅव्हल डेस्टिनेशनमध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे, दमण. दमण अनेक लोकांसाठी वीकेंड डेस्टिनेशन आहे. तुम्हीही समर हॉलिडेसाठई डेस्टिनेशन शोधत असाल तर तुम्ही दमणचा विचर करू शकता. इथे तुम्हाला सुंदर समुद्री किनाऱ्यांसोबतच तेथील खाद्यसंस्कृतीचाही आनंद घेता येईल. जाणून घेऊया दमणमधील काही ठिकाणांबाबत...

सेंट जेरोम फोर्ट एक्सप्लोर करा 

शहरातील सर्वात स्वच्छ आणि रंगीत हिस्स्यांपैकी एक म्हणजे, नानी दमणमध्ये असलेला किल्ला. इथे तुम्हाला फक्त शहरातील सर्वात जुन्या ठिकाणांसोबतच काही पोर्तुगीजांनी उभारलेल्या वास्तूंनाही भेट देता येईल. येथे कॅथेड्रल ऑफ बोम जीजस स्थित एक चर्च आहे, जे 1603 मध्ये उभारण्यात आलं होतं. 

लाइटहाउस पाहा

दमणमध्ये असलेल्या लाइटहाउसबाबत एक उत्तम गोष्ट म्हणजे, जिथून तुम्ही समुद्र, मच्छिबाजार आणि दूरपर्यंत समुद्रात विखूरलेल्या बोटी पाहता येतील. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत येथे क्वालिटी टाइम स्पेंड करू शकता. सकाळी होणारा सूर्योदय आणि संध्याकाळचा सूर्यास्त पाहण्यासाठी ही जागा उत्तम आहे. 

समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्याचा आनंद घ्या

दमणमध्ये दोन प्रमुख बीच आहेत, ज्यांचं नाव Jampore आणि Devka आहे. तुम्हाला येथे फक्त सी-फूड सर्व केलं जातं. हे बीच स्विमर्सचा सर्वात आवडीचा स्पॉट आहे. येथील वातावरण अत्यंत शांत असून तुमचं मन प्रसन्न होईल. पिकनिकला जाण्यासाठी, मित्र-मैत्रिणींसोबत एन्जॉय करण्यासाठी ही जागा अत्यंत सुंदर आहे. 

याव्यतिरिक्त दमण आणि दीवमध्ये खूप अशी ठिकाणं आहेत. जिथे तुम्ही फिरू शकता. यामध्ये दमणगंगा,  Our Lady of Rosary Chapel, हिल्सा अक्वेरियम, Kachigam Water Tank, हत्ती पार्क,  ब्रिज साइड गार्डन आणि बॉम जीसस चर्च यांसारख्या ठिकाणांचा समावेश होतो. त्यामुळे तुम्ही जर दीव-दमणचा प्लॅन करत असाल तर आधीच एक लिस्ट तयार करा आणि मनसोक्त फिरण्याचा आनंद घ्या. 

Web Title: Daman best destination jampore beach lighthouse fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.