झाड खिळेमुक्त करण्याचा युवकांचा निर्धार, कल्याण शहरात राबवली अनोखी मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 02:30 PM2018-04-16T14:30:53+5:302018-04-16T14:30:53+5:30

आंघोळीची गोळी या उपक्रमाच्या माध्यमाने पाणी बचतीचा संदेश देणारी मुंबईतील तरुण मंडळी जागोजागी पाणी वाचवण्याचे आवाहन करत असते.

Youth's determination to unleash the tree, unique campaign in Kalyan city | झाड खिळेमुक्त करण्याचा युवकांचा निर्धार, कल्याण शहरात राबवली अनोखी मोहीम

झाड खिळेमुक्त करण्याचा युवकांचा निर्धार, कल्याण शहरात राबवली अनोखी मोहीम

Next

कल्याण - आंघोळीची गोळी या उपक्रमाच्या माध्यमाने पाणी बचतीचा संदेश देणारी मुंबईतील तरुण मंडळी जागोजागी पाणी वाचवण्याचे आवाहन करत असते. प्रेम, त्याग, बंधुभाव, बचत ह्या चार तत्वांवर आंघोळीची गोळी उभारलेली आहे. पाणी वाचवण्याचे ध्येय उराशी बाळगून आंघोळीची गोळी टीम मुंबई ही तरुण मंडळी शाळा, महाविद्यालये तसेच खेडोपाडी जाऊन लोकांना पाण्याचे महत्त्व पटवून देत असते.

याच आंघोळीच्या गोळीच्या टीमने नुकतेच मुंबई मधील दादर परिसरात झाडांवरील खिळे काढण्याचा स्तुत्य उपक्रम एप्रिल फूल म्हणजेच १ एप्रिलला शिवाजी पार्क परिसरात सुरु केला. झाडांनाही संवेदना असतात तेही सजीव आहेत पण फक्त त्यांना बोलता येत नाही त्यामुळे ते व्यक्त होऊ शकत नाहीत परंतु त्यांच्या वेदना आम्हाला ऐकू येत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या वेदना कमी करण्याचा आमचा अट्टहास आहे असे सांगत खिळे मुक्त झाडाच्या संकल्पनेचा उदय पुण्यात सर्वात प्रथम झाला आणि त्यातून प्रेरित होऊन मुंबई टीमने हा उपक्रम पहिल्यांदा दादर येथे राबवला याचं युवकांनी एकत्र येऊन ऐतिहासिक कल्याण शहरांतील बिर्ला महाविद्यालय ते खडकपाडा सर्कल यादरम्यान असलेल्या झाडांवरील खिळे काढण्याचा प्रयत्न केला.

आमचा हा उपक्रम आजच्या पुरता मर्यादित नसून मुंबईतील विविध भागात तरुणांनी व नागरिकांनी एकत्रित अशा प्रकारचे उपक्रम राबवावे असे आवाहन आंघोळीची गोळी टीमने यावेळीं केले. पुण्याच्या माधव पाटील या तरूणाने सुरु केलेली खिळेमुक्त झाडं मोहीम ठाणे आणि मुंबई परिसरात विस्तारण्यासाठी अंघोळीची गोळी टीम मुंबई प्रयत्न करत आहे आणि पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत अनेक सामाजिक संस्थांची मदत या युवकांना मिळत आहे. साधारण ३० युवकांच्या या टीमने दोन तासांत ६० पेक्षा अधिक झाडे यावेळीं खिळेमुक्त केली.

Web Title: Youth's determination to unleash the tree, unique campaign in Kalyan city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.