डोंबिवलीत रंगला मातीतल्या कुस्तीचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 08:51 AM2018-04-09T08:51:36+5:302018-04-09T08:51:36+5:30

डोंबिवली शहराच्या पश्चिमेकडील मोठा गाव जत्रेत रविवारी (8 एप्रिल) मंडळाच्या प्रथेप्रमाणे मातीतल्या कुस्तीचे सामने खेळवण्यात आले.

Wrestling competition in Dombivli | डोंबिवलीत रंगला मातीतल्या कुस्तीचा थरार

डोंबिवलीत रंगला मातीतल्या कुस्तीचा थरार

Next

डोंबिवली - डोंबिवली शहराच्या पश्चिमेकडील मोठा गाव जत्रेत रविवारी (8 एप्रिल) मंडळाच्या प्रथेप्रमाणे मातीतल्या कुस्तीचे सामने खेळवण्यात आले. या कुस्ती स्पर्धेला शंभर वर्षांची परंपरा आहे. डोंबिवलीच्या मोठा गाव भागात सध्या मोठी जत्रा भरली अडून दोन दिवस चालणाऱ्या या जत्रेत कुस्तीचे सामने हे प्रमुख आकर्षण असतं. विशेष म्हणजे सध्या मातीच्या कुस्तीची जागा मॅटवरील कुस्तीने घेतलेली असताना डोंबिवलीत मात्र मातीतले कुस्ती सामने खेळवले जातात.

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या कुस्ती स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून मल्ल डोंबिवलीत येतात. शिवाय पुरुषच नव्हे, तर महिला आणि अपंगांचे कुस्ती सामनेही इथं खेळवले जातात. यापैकी विजेत्याला मानाची गदा आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येतं. ही स्पर्धा पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून कुस्तीप्रेमींची मोठी गर्दी मोठागावात होत असते.

Web Title: Wrestling competition in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.