श्रमदानातून १४ गावांत विकासगंगा, जिल्हा परिषदेचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 02:42 AM2019-06-23T02:42:43+5:302019-06-23T02:43:19+5:30

जिल्हा प्रशासनाच्या महसूल योजना, दाखल्यांचे वाटप, भरीव लाभाच्या सवलती आता मुरबाड तालुक्यातील १४ गावकऱ्यांच्या दारातच जाणार आहेत.

Work from 14th village Vikasganga, Zilla Parishad's initiative | श्रमदानातून १४ गावांत विकासगंगा, जिल्हा परिषदेचा पुढाकार

श्रमदानातून १४ गावांत विकासगंगा, जिल्हा परिषदेचा पुढाकार

Next

- सुरेश लोखंडे
ठाणे - घरकुलांसारख्या भरीव शासकीय योजनांसह नळपाणीपुरवठा, परसबागेच्या कृषी योजना, अमृत आहार, आरोग्यवर्धक योजना, शौचखड्डे, वृक्षलागवड आदी जिल्हा परिषदेच्या योजनांसह जिल्हा प्रशासनाच्या महसूल योजना, दाखल्यांचे वाटप, भरीव लाभाच्या सवलती आता मुरबाड तालुक्यातील १४ गावकऱ्यांच्या दारातच जाणार आहेत. यासाठी प्रथम वडाचीवाडी या १०० टक्के आदिवासी लोकवस्तीच्या गावाची निवड केली आहे.
स्वत:च्या गावाचा विकास साधण्यासाठी उत्स्फूर्त लोकसहभाग आणि त्यांचे श्रमदान आदींमुळे वडाच्यावाडीत शासनाच्या योजनांना स्वत:हून गावात येणे भाग पडत आहे. १२५ घरांची ही वडाचीवाडी एकलहरे मुरबाड व म्हसा येथून २५ किमी अंतरावर आहे. यातील गावकऱ्यांची एकजूट, सार्वजनिक हितासाठी त्यांचा उत्स्फूर्त सहभाग, श्रमदानासाठी सातत्याने प्रत्येकाची आघाडी, त्यातून साधला जाणारा गावाचा विकास आदींवर लक्ष केंद्रित करून या वडाचीवाडीतील गावकºयांसाठी आता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व
जि. प.चे सीइओ हिरालाल सोनवणे यांनी शासनाच्या योजना थेट गावातच पोहोचवण्याचा निर्धार केला आहे. या गावकºयांना व योजनेच्या लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयात आता जाण्याची गरज नाही. तर, स्वत:हून प्रशासनच गावात जाणार आहे.
असा देणार लाभ
जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभाग व श्रमदानातून गावविकास साधण्यासाठी पुढे येणाºया १४ गावांच्या गावकºयांसाठी पहिल्या टप्प्यात या मोहिमेचा लाभ दिला जाणार आहे. वडाचीवाडीतील गावकºयांना या मोहिमेचा लाभ प्रायोगिकतत्त्वावर प्राधान्यक्रमाने देण्याचे निश्चित झाले आहे. या गावकºयांचा लोकसहभाग व श्रमदानाच्या प्रोत्साहनातून पुढे येणाºया अन्यही गावांना या मोहिमेत प्राधान्यक्रमाने सहभागी करून घेण्याचे नियोजनही केले आहे. याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या गावांमध्ये शासनाच्या योजना स्वत:हून पोहोच करण्यासाठी यंत्रणा सतर्क केली जाणार आहे. संबंधित तालुकापातळीवरील तहसीलदार, गटविकास अधिकारी आदींसह स्थानिक पातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्यसेवक, रेशनिंगकार्ड वितरण यंत्रणा आदी त्यांच्या योजना, दाखले स्वत:हून लाभार्थ्यांना घरपोच करणार असल्याच्या वृत्तास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी दुजोरा दिला आहे.
बांगर यांच्यावर जबाबदारी
गावविकासाची ही लोकचळवळ व्हावी, यासाठी गावकºयांना पाठबळ देणारे मुरबाड तालुक्यातील शेलारी येथील शिक्षक योगेंद्र बांगर यांच्यावर खास संयोजक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बांगर यांचे सहकार्य घेण्यासाठी सीईओ यांनी त्यांची बदली खास मुरबाडला तालुकापातळीवर करून घेतली आहे. टोकावडेजवळील फांगणे गावातील सर्व आजीबार्इंना एकत्र करून त्यांना शालेय शिक्षण बांगर यांनी याआधी दिले आहे. आताही त्यांनी शेलारी येथे निसर्गशाळा सुरू केली आहे. लोकसहभाग मिळवण्याचे कौशल्य बांगर यांच्यात असल्यामुळे गावविकासाच्या मोहिमेसाठी त्यांचे सहकार्य जिल्हा परिषद घेत आहे. गावकºयांचा लोकसहभाग आणि त्यांच्या श्रमदानातून ‘गावविकास’ साधणारी ‘लोकचळवळ’ करण्यासाठी जिल्हाधिकाºयांसह सीईओ यांनी नुकताच संयुक्तपणे गावखेड्यांचा पाहणी दौरा करून गाव, पाडे, त्यातील ग्रामस्थ, समाजसेवक आदींची चाचपणी केली आहे.

ईजीएसच्या माध्यमातून मिळणार रोजगार

गावकºयांचा लोकसहभाग आणि त्यांच्या श्रमदानातून गावाचा होणारा विकास साधला जात असताना त्यांना ईजीएसच्या माध्यमातून रोजगारही उपलब्ध होणार आहे. यातून रस्त्यांचीदेखील कामे होतील. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या बीपीएलकार्डची चौकशी करून त्यास त्वरित रेशनकार्ड देण्याचे नियोजन केले जाईल. अंगणवाडीच्या पोषण आहार, अमृत आहाराचा लाभ वयोवृद्ध महिलांसह गरोदर मातांना दिला जाईल. सुदृढतेसाठी त्वरित आरोग्यतपासणी, ब्लड टेस्टिंग, औषधोपचार दिले जातील. घरांवर पडणारे पावसाचे पाणी वाहून जाऊ नये, त्याचा पुनर्वापर करणे शक्य व्हावे, यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग स्कीम राबवणार आहे. शौचखड्डे तयार करणार, वृक्षलागवडीसाठी खड्डे तयार केले जातील. त्यास ईजीएसच्या माध्यमातून मजुरी मिळवून दिली जाईल. परसबाग तयार करून ताज्या पालेभाज्या मिळवता याव्यात, कुपोषणमुक्तीसाठीदेखील उपयुक्त ठरणाºया परसबागेसाठी कृषी विभागाच्या योजना राबवून बी-बियाणे देण्याचे नियोजन आहे. मुबलक पाण्यासाठी पाणीपुरवठा योजना सुरू करण्याच्या दृष्टीने गावकºयांचा लोकसहभाग प्राप्त केला जाणार आहे.

Web Title: Work from 14th village Vikasganga, Zilla Parishad's initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे