वाचवायला गेला... आणि जीव गमावला, तरुणाची हत्या, कोळसेवाडीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 06:03 AM2017-10-18T06:03:14+5:302017-10-18T06:03:28+5:30

क्षुल्लक वादातून निखिल चौरसिया याच्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याने त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या आफ्रिदी उर्फ साजन राजू शहा याला आपला जीव गमवावा लागल्याची घटना सोमवारी मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास...

Went to save ... and lost his life, the murder of the youth, the incident in the coalition | वाचवायला गेला... आणि जीव गमावला, तरुणाची हत्या, कोळसेवाडीतील घटना

वाचवायला गेला... आणि जीव गमावला, तरुणाची हत्या, कोळसेवाडीतील घटना

Next

कल्याण : क्षुल्लक वादातून निखिल चौरसिया याच्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याने त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या आफ्रिदी उर्फ साजन राजू शहा याला आपला जीव गमवावा लागल्याची घटना सोमवारी मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास कोळसेवाडी परिसरातील हरी पाटील कॉलनी येथे घडली. याप्रकरणी सरईत गुन्हेगार बबलू चौरसिया, आकाश मोहिते, सौद खान उर्फ सौदी, बंगाली आणि अन्य साथीदारांवर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.
निखिलचा भाऊ साहील याने खांद्यावर हात ठेवल्याने बबलू यास त्याचा राग आला. या वेळी बबलूला समजवण्यास निखिल गेला असता बबलू आणि त्याच्या साथीदारांनी त्याला ठोशाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यात बबलुने त्याच्याकडील चाकू निखिलच्या पोटात खुपसून त्यास गंभीर जखमी केले. या वेळी त्याला वाचवायला आफ्रिदी आला असता त्याच्यावरही बबलूने चाकूने वार केले. तसेच इतर साथीदारांनी ठोशाबुक्यांनी मारहाणही केली. त्यात आफिद्रीचा मृत्यू झाला. तर जखमी निखिल याच्यावर मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, बबलू हा हिस्ट्रीशीटर असून त्याच्या नावावर कोळसेवाडी आणि विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आफ्रिदीच्या नातेवाइकांनी मृतदेह कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात नेऊन आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केल्याचे समजते.

Web Title: Went to save ... and lost his life, the murder of the youth, the incident in the coalition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.