वामन म्हात्रे यांचा राजीनामा तत्काळ मंजूर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:48 AM2017-08-01T02:48:24+5:302017-08-01T02:48:25+5:30

केडीएमसीच्या भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी २४ जुलैला सदस्यत्वाचा राजीनामा महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्त पी. वेलरासू यांना पाठवला खरा,

Waman Mhatre's resignation should be approved immediately | वामन म्हात्रे यांचा राजीनामा तत्काळ मंजूर करावा

वामन म्हात्रे यांचा राजीनामा तत्काळ मंजूर करावा

Next

कल्याण : केडीएमसीच्या भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी २४ जुलैला सदस्यत्वाचा राजीनामा महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्त पी. वेलरासू यांना पाठवला खरा, पण तो उशिराने दोघांच्या दप्तरी दाखल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने आयुक्तांना निवेदन पाठवून राजीनामा तत्काळ मंजूर करण्याची विनंती केली आहे, तर विरोधी पक्ष मनसेनेही म्हात्रे यांच्या राजीनाम्यावर टीका केली आहे. हा प्रसिद्धीचा स्टंट असल्याचे मनसेचे गटनेते प्रकाश भोईर यांनी म्हटले आहे.
म्हात्रे हे शिवसेनेतील ज्येष्ठ नगरसेवक आहेत. फेरीवाला अतिक्रमण, पाणीचोरी, अन्यायकारक वसुली, अधिकाºयांची लाचखोरी, टॉवर आणि इमारती यांना कर लावण्यात होत असलेली टाळाटाळ, यामध्ये महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे म्हात्रे यांनी वारंवार छेडलेल्या आंदोलनातून दाखवून दिले आहे. मात्र, म्हात्रे यांनी पाठवलेला राजीनामा मिळाला नसल्याचे स्पष्टीकरण महापौर आणि आयुक्त कार्यालयाने दिल्याने राजीनामा हरवल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. अखेर, उशिरा का होईना, राजीनामा मिळाल्याचे स्पष्टीकरण संबंधित कार्यालयांनी दिले. त्यामुळे राजीनाम्यावर कोणता निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.
राजीनामा हरवल्याबाबत ‘लोकमत’मध्ये आलेल्या वृत्ताचा दाखला देत तो सापडल्याचा दावा राष्ट्रवादीने केला. यासंदर्भात सोमवारी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर पाटील, प्रदेश सचिव समीर भोईर, डोंबिवलीचे कार्याध्यक्ष राजेंद्र नांदोस्कर, सरचिटणीस जगदीश ठाकूर, उपाध्यक्ष प्रसन्न आचलकर आदींनी केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या नागरी सुविधा केंद्रात म्हात्रे यांच्या राजीनाम्याची झेरॉक्स सादर करत तो तत्काळ मंजूर करण्याची विनंती केली. या राजीनाम्यामुळे तरी अधिकाºयांना जाग येईल, शहराचा विकास होईल, असे मत सुधीर पाटील यांनी व्यक्त केले.

Web Title: Waman Mhatre's resignation should be approved immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.