विनोद तावडे यांनी केली प्रियंका गांधींची शूर्पणखेशी तुलना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 03:09 AM2019-02-11T03:09:02+5:302019-02-11T03:09:15+5:30

रावणाने बहीण शूर्पणखा, हिरण्यकश्यपूने होलिका आणि कंसाने पूतनामावशीस विरोधकांविरुद्ध वापरल्याचा इतिहास आहे. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

Vinod Tawde has compared Priyanka Gandhi's epitome of scales | विनोद तावडे यांनी केली प्रियंका गांधींची शूर्पणखेशी तुलना

विनोद तावडे यांनी केली प्रियंका गांधींची शूर्पणखेशी तुलना

googlenewsNext

भिवंडी : रावणाने बहीण शूर्पणखा, हिरण्यकश्यपूने होलिका आणि कंसाने पूतनामावशीस विरोधकांविरुद्ध वापरल्याचा इतिहास आहे. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता राहुल गांधी यांनी प्रियंका गांधींना प्रचारात उतरविले असून त्यांनाही पराभवालाच सामोरे जावे लागेल. काही वर्षांनी प्रियंकांचा मुलगाही प्रचारात उतरलेला पाहावयास मिळेल, अशी टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी भिवंडी येथे भाजपाच्या बैठकीत केली.
भिवंडी तालुक्यातील अंजूर येथे ठाणे व पालघर विभागांतील भिवंडी, कल्याण, पालघर व ठाणे या चार लोकसभा मतदारसंघांतील शक्तिप्रमुखांची बैठक
रविवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, राजेंद्र गावित, आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, महेश चौघुले, नरेंद्र पवार, पास्कल धनारे, ज्येष्ठ
नेते जगन्नाथ पाटील, दिगंबर
विशे, संघटनमंत्री सतीश धोंड, जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, शहराध्यक्ष संतोष शेट्टी, संदीप
लेले आदी उपस्थित होते. या बैठकीला दोन्ही जिल्ह्यांतील शक्तिप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पक्षाच्या शक्तिकेंद्रप्रमुखांमार्फत बुथ मजबूत करण्यासाठी आढावा घेण्यात आला. तावडे यांनी व्यासपीठावरून खाली
उतरून कार्यकर्त्यांशी संवाद
साधला.

राहुल गांधी देशद्रोही असल्याचा आरोप
राफेल करारासंदर्भात आरोप करणारे राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष देशद्रोही असल्याची टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली. पूर्वी हिंदी चित्रपटांत रॉबर्ट नावाचा खलनायक असे. आताच्या रॉबर्टनेही अशीच लूट चालविली असल्याची टीका भातखळकर यांनी रॉबर्ट वाड्रा यांचे नाव न घेता केली.

Web Title: Vinod Tawde has compared Priyanka Gandhi's epitome of scales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.