अनाधिकृत बांधकामाने घेतला मजुराचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:09 AM2019-04-28T00:09:42+5:302019-04-28T00:10:16+5:30

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये महापालिका आणि लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने चालणाऱ्या अनधिकृत बांधकामांचा अखेर आज एक मजूर बळी गेला . ...

Victim of unauthorized construction | अनाधिकृत बांधकामाने घेतला मजुराचा बळी

अनाधिकृत बांधकामाने घेतला मजुराचा बळी

Next

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये महापालिका आणि लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने चालणाऱ्या अनधिकृत बांधकामांचा अखेर आज एक मजूर बळी गेला . भाईंदरच्या गणेश देवल नगर मध्ये वरच्या मजल्याचे बेकायदा बांधकाम सुरु असताना खाली पडून शिवपूजन गुप्ता ( 50 ) रा. गणेश देवल नगर या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली आहे . 

मीरा भाईंदर मध्ये सातत्याने सरकारी , खाजगी , कांदळवन , सीआरझेड , नाविकास तसेच आदिवासी जमिनींवर मोठ्या प्रमाणात नव्याने तसेच वाढीव बांधकामे होत आहेत . त्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी होत आहेत . तरी देखील महापालिका प्रशासना कडून नाममात्र बांधकामांवर थातुरमातुर कारवाई करून बहुतांश बांधकामांना संरक्षण देण्याचे काम सुरु आहे . यात मोठ्या प्रमाणात अर्थकारण असल्याने नगरसेवकां पासून आमदार व अन्य राजकारणी सुद्धा अनधिकृत बांधकामां विरोधात पालिकेला कारवाई करायला लावत नाही . काही लोकप्रतिनिधींचे सुद्धा यात कल्याण होत असल्याने त्यांचा सुद्धा पाठिंबा या बेकायदा बांधकामांना असल्याचे लपून राहिलेले नाही . 

भाईंदर पश्चिमेच्या गणेश देवल ह्या सीआरझेड व सरकारी जागेत मोठ्या प्रमाणात वरचा मजला वाढवण्याची तसेच नव्याने बांधकामे सुरु असताना सरसकट कारवाई होत नाही . राजकारण्यांचा सुद्धा कारवाई करू नये म्हणून दबाव असतो . येथील प्रशांत चौरसिया याचे वरचा मजला वाढवण्याचे बेकायदा बांधकाम गेल्या आठ - दहा दिवसां पासून सुरु आहे . आज शनिवारी रात्री सुद्धा बांधकाम सुरु असताना मजुरी काम करणारे गुप्ता खाली पडले . त्यात त्यांचा मृत्यू झाला . मृतदेह शवविच्छेदना साठी पालिकेच्या टेम्बा येथे नेण्यात आला . सदर घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानिक भाजपा नगरसेवक अशोक तिवारी व पंकज उर्फ दरोगा पांडे यांनी सुद्धा टेम्बाला जाऊन विचारपूरस केली . दरम्यान अनधिकृत बांधकाम करताना ,मजुराचा बळी गेल्याने येथील मोठ्या प्रमाणात चालणारी बेकायदा बांधकामे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत . 

Web Title: Victim of unauthorized construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.