पासपोर्टसाठीची पडताळणी: पोलिसांची घरपोच सेवा, ठाणे ग्रामीण पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

By जितेंद्र कालेकर | Updated: December 26, 2017 20:12 IST2017-12-25T19:27:23+5:302017-12-26T20:12:25+5:30

नागरिकांना यापुढे आपल्या पासपोर्टसाठी पोलीस ठाण्यात फे-या मारण्याची गरज राहणार नाही. पासपोर्टच्या पडताळणीसाठी ठाणे ग्रामीणच्या पोलिसांनी ‘एम पासपोर्ट’ या अ‍ॅपद्वारे घरपोच ही सेवा सुरु केली आहे.

Verification of Passport: Police Home Service, Thane Rural Police Praising Program | पासपोर्टसाठीची पडताळणी: पोलिसांची घरपोच सेवा, ठाणे ग्रामीण पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

ठाणे ग्रामीण पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

ठळक मुद्देपासपोर्ट कार्यालयाच्या मदतीने उपक्रमाची सुरुवातअडीच लाखांच्या खर्चातून सर्व पोलीस ठाण्यांना मिळाले टॅबगतिमान आणि पारदर्शक सेवेसाठी पोलिसांचे एक पाऊल पुढे

जितेंद्र कालेकर
ठाणे: प्रवास, शिक्षण अथवा पर्यटनासाठी परदेशात जाणा-यांसाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी पारपत्र (पासपोर्ट) पडताळणी अत्यंत सोपी केली आहे. संबंधित अर्जदाराने पासपोर्टसाठी आॅनलाईन अर्ज केल्यानंतर पोलीस संपूर्ण माहिती घेण्यासाठी टॅब घेऊनच घरी पोहचणार आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात जाण्याचीही गरज नसल्यामुळे लोकांचा वेळ आणि खर्चही वाचणार असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
केंद्र शासनाच्या गतिमान आणि पारदर्शक शासन योजनेंतर्गत पासपोर्ट विभागाने ही योजना राबविण्याचे देशभरातील पोलिस यंत्रणांना सूचित केले आहे. राज्यात काही मोजक्या जिल्हयांमध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून त्यामध्ये ठाणे ग्रामीणचा समावेश आहे. त्यानुसार सुमारे अडीच लाख रुपये खर्चातून १७ पोलीस ठाण्यांचे प्रत्येकी दोन कर्मचारी आणि अधीक्षक कार्यालयासाठी एक असे १८ टॅब खरेदी करण्यात आले. पासपोर्टची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी ‘एम पासपोर्ट’ हे अ‍ॅप सुरु केले आहे. त्यामुळे एखाद्याने पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर त्याची फाईल तो वास्तव्यास असलेल्या ठाणे ग्रामीणच्या संबंधित पोलीस ठाण्यात पासपोर्ट कार्यालयामार्फत पाठविली जाते. ती आल्यानंतर त्या पोलीस ठाण्याचा पोलीस कर्मचारी संबंधितांच्या घरी जाऊन वास्तव्याची तसेच इतर कागदपत्रांची पडताळणी करतात. त्याचवेळी त्याच्याविरुद्ध कोणता गुन्हा वगैरे दाखल आहे किंवा कसे? याचीही माहिती घेतली जाते. ही माहिती घेतल्यानंतर जागीच त्याचा फोटो घेऊन कागदपत्रेही टॅबद्वारेच स्कॅन केली जातात. ही माहिती दुस-याच दिवशी पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठविली जाते. साधारण तीन ते पाच दिवसांमध्ये ही संपूर्ण पडताळणी झाल्यानंतर संबंधितांना आॅनलाईनच पडताळणी झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. पूर्वी याच कामासाठी दोन दोन महिनेही लागत होते. आता हे काम अवघ्या एका आठवडयात तेही कोणत्याही खर्चाविना अल्पावधीत होत असल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असल्याची माहिती ठाणे ग्रामीणच्या विशेष शाखेने दिली.
‘‘ पूर्वी पासपोर्ट पडताळणीसाठी नागरिकांना पोलीस ठाण्यात बºयाच फे-या माराव्या लागत होत्या. आता केंद्र शासनाच्या गतिमान आणि पारदर्शक शासन धोरणांतर्गत पासपोर्ट कार्यालयाच्या मदतीने पासपोर्टसाठी ही घरपोच सेवा नागरिकांना ठाणे ग्रामीणच्या १७ पोेलीस ठाण्यात सुरु केली आहे. त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षणही दिले आहे. घरी आलेल्या पोलिसांकडून सौजन्याची वागणूक मिळाल्यानंतर पोलिसांची प्रतिमाही सुधारण्यास मदत होते. कामात गती येऊन लोकांचाही वेळ वाचतो. शिवाय, कामातही पारदर्शकता येते.’’
डॉ. महेश पाटील, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण.

Web Title: Verification of Passport: Police Home Service, Thane Rural Police Praising Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.