उल्हासनगरात गोमांसचा ट्रक पकडला, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 09:13 PM2018-07-30T21:13:00+5:302018-07-30T21:13:08+5:30

शहरातील शहाड फाटक येथून गोमांसचा ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यानी पकडून दिला.

 In the Ulhasanagar, the beef was caught, the accused filed | उल्हासनगरात गोमांसचा ट्रक पकडला, गुन्हा दाखल

उल्हासनगरात गोमांसचा ट्रक पकडला, गुन्हा दाखल

Next

उल्हासनगर : शहरातील शहाड फाटक येथून गोमांसचा ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यानी पकडून दिला. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला अटक केली आहे. उल्हासनगर कॅम्प नं-1 शहाड फाटक येथून रविवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास गोमांसचा ट्रक जाणार असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली.

शहाड येथून एम एच 17-5247 नावाचा ट्रक अडवून ट्रकची पाहणी केली. ट्रक मध्ये गोमांस आढळल्याने एकच खळबळ उडाली. याबाबतची माहिती उल्हासनगर पोलिसांना दिल्यावर, गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करण्याचा आरोप बजरंग दल व ओमी टीम कार्यकर्त्यांनी केला. कार्यकर्ते आक्रमक झाल्यावर पोलिसांनी गोमांससह ट्रक ताब्यात घेऊन चालक मोकीब जब्बार फरक याला अटक केली. तसेच उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखला केला.

Web Title:  In the Ulhasanagar, the beef was caught, the accused filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक