आज खरोखर किचन राजाराणीचं झाले आहे : शर्वरी पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 05:01 PM2018-11-26T17:01:54+5:302018-11-26T17:10:33+5:30

पाककलेवर आधारीत किचन राजाराणीचे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

Today, it has become really the kitchen sir: Sharwari Patankar | आज खरोखर किचन राजाराणीचं झाले आहे : शर्वरी पाटणकर

आज खरोखर किचन राजाराणीचं झाले आहे : शर्वरी पाटणकर

Next
ठळक मुद्देआज खरोखर किचन राजाराणीचं झाले आहे : शर्वरी पाटणकरपाककलेवर आधारीत किचन राजाराणीचे या पुस्तकाचे प्रकाशन६४ कलांमध्ये पाककलेचा समावेश : धनश्री लेले

ठाणे: पुर्वीच्या काळी किचन फक्त राणीचे होते पण आता राणी करिअरसाठी बाहेर पडू लागल्यात आणि किचनमध्ये राणीबरोबर राजानेही पाय ठेवलाय. हल्ली खुप आवड असलेल्या मुली किचनमध्ये जातात. आज खरोखर किचन राजाराणीचं झाले आहे अशा भावना अभिनेत्री व संवाद लेखिका शर्वरी पाटणकर यांनी व्यक्त केल्या. 
      मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे आणि शुभांगी प्रतिष्ठान, ठाणे यांच्यावतीने शुभांगी फडके व संजीव फडके लिखित ‘किचन राजाराणी’ या पुस्तकाचे प्रकाशन मराठी ग्रंथ संग्रहालय येथे करण्यात आले. निवेदिका धनश्री लेले म्हणाल्या की, आपल्या संस्कृतीने प्रत्येक गोष्टीत सौंदर्य भरेल आहे. ६४ कलांमध्ये पाककलेचा समावेश आहे. प्रत्येक गोष्ट सौंदर्याने भरणे ही भारतीयांची कला आहे. कोणत्याही कलेसाठी पाककला उत्तम जमावी लागते कारण या कलेत अनेक कलांची बीजे रोवलेली असतात. पाककलेच्या पुस्तकांना मरण नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष प्रा विद्याधर वालावलकर यांनी पाककलेचे पुस्तक हा साहित्यप्रकार असून पाककला हे एक शास्त्र असल्याचे ते म्हणाले. ज्येष्ठ लेखक सुमेध वडावाला म्हणाले की, उत्तम पुस्तकं ही वाचकाला समृद्ध करीत असतात. फडके यांचे पुस्तक घरोघरी बल्लवाचार्य निर्माण करणारे पुस्तक असल्याचे कौतुकौद्गार त्यांनी काढले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार स्वप्नील सावरकर, ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते, प्रकाशक विघ्नेश गोखले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वृत्तनिवेदक विशाल पाटील यांनी केले. 
 

Web Title: Today, it has become really the kitchen sir: Sharwari Patankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.