Tihar arrested along with key accused in Badlapur Sagar Investments | बदलापूर सागर इन्व्हेस्टमेंटमधील प्रमुख आरोपीसह तीघांना अटक
बदलापूर सागर इन्व्हेस्टमेंटमधील प्रमुख आरोपीसह तीघांना अटक

बदलापूर: बदलापूरातील बहुप्रतिक्षित सागर इन्व्हेस्टमेंटमधील प्रमुख आरोपी असलेल्या श्रीराम समुद्र याला पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबत पत्नी , चुलत भाऊ आणि काकू यांना देखील अटक करण्यात आली आहे. त्यांना आज कल्याणच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या चौघांना 13 मार्च र्पयत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरु असुन मुख्य आरोपी ताब्यात आल्याने तपासाला गती मिळणार आहे. 

बदलापूरात सागर इन्व्हेस्टमेंटच्या नावावर जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवित सुहास समुद्र आणि त्याची पत्नी  सुनिता समुद्र यांनी संपूर्ण बदलापूरकरांना आपल्या जाळ्यात अडकविले होते. 14 ते 18 टक्के व्याज मिळत असल्याने अनेकांनी त्यांच्याकडे पैसे गुंतविले होते. अनेक वर्ष त्यातील अनेक गुंतवणूकदारांना नियमित व्याजदरही मिळत होते. मात्र नोटबंदीच्या काळात या व्यावसायातील फसवेपणा उघड झाला. नोटबंदीनंतर गुंतवणूकदरांना व्याज मिळणो बंद झाले. येवढेच नव्हे तर गुंतवलेली रक्कम देखील परत देण्यात आली नाही. पैसे देतो असे सांगुन समुद्र कुटुंबियांनी 6 महिने पुढे ढकलले. मात्र गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तक्रारींचा पाऊस पाडला. अखेर फसले गेलेल्यांना एकत्रित करुन संघटना स्थापन करित गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी असलेले सुहास आणि सुनिता समुद्र यांना ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि समुद्र दांम्प्त्याचा मुलगा श्रीराम समुद्र गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार होता. अखेर एका वर्षानंतर श्रीराम समुद्र याला अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे. श्रीराम हा परदेशात पळून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र श्रीराम हा देशातच लपुन बसला होता. या प्रकरणात अटकपुर्व जामिनासाठी देखील त्यांनी प्रय} केले होते. त्यांचे जामिन अर्ज फेटाळण्यात आले होते. अखेर श्रीराम आणि त्याच्ची पत्नी  अनघा यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. आहे. सोबत श्रीरामची काकू सुप्रीती समुद्र आणि कैवल्य समुद्र यांना देखील अटक करण्यात आली आहे. संपूर्ण समुद्र कुटुंबियांनी हा पैशांचा अपहार केला होता. कल्याण न्यायालयात या चौघांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना 13 मार्च र्पयत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

दरम्यान श्रीराम समुद्र आणि इतर आरोपींना न्यायालयात आणले असता न्यायालयात या गुंतवणूकदरांनी समुद्र यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे त्यात ज्येष्ठ नागरिकांचा समावे सर्वाधिक असल्याने त्यांनी न्यायालयाच्या आवारात जोर जोरात घाषणा देत गोंधळ घातला होता. 


Web Title: Tihar arrested along with key accused in Badlapur Sagar Investments
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.