ठाण्यात निवड - वरिष्ठ वेतनश्रेणीच्या निर्णया विरोधात शिक्षकांचा मोर्चा; मात्र जिल्हाधिकारी कार्यालय बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 09:22 PM2017-11-04T21:22:21+5:302017-11-04T21:22:29+5:30

शिक्षकांची निवडश्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणीच्या जाचक अटीचा नुकताच जारी झालेला निर्णय तत्काळ रद्द करावा, आदी मागण्यांसाठी ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी मोर्चा काढला.

Thane Selection - Teacher's Front Against Senior Pay Scale; However, the closure of the Collector Office | ठाण्यात निवड - वरिष्ठ वेतनश्रेणीच्या निर्णया विरोधात शिक्षकांचा मोर्चा; मात्र जिल्हाधिकारी कार्यालय बंद

ठाण्यात निवड - वरिष्ठ वेतनश्रेणीच्या निर्णया विरोधात शिक्षकांचा मोर्चा; मात्र जिल्हाधिकारी कार्यालय बंद

Next

ठाणे - शिक्षकांची निवडश्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणीच्या जाचक अटीचा नुकताच जारी झालेला निर्णय तत्काळ रद्द करावा, आदी मागण्यांसाठी ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी मोर्चा काढला.मात्र गुरूनानक जयंती निमित्त कार्यालय बंद असल्यामुळे ठाणे जिल्हाधिकाºयांऐवजी शिक्षकांच्या या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर - यादव यांना मागण्यांचे निवेदन दिले.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील प्राथमिक शिक्षक येथील शासकीय विश्रामगृहाजवळ एकत्र येऊन त्यांनी शासनाच्या निर्णया विरोधात जोरदार निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालयास सुमारे आठ दिवस आधी निवेदन देऊन मोर्चाचे आयोजन निश्चित करण्यात आले. यानुसार शेकडे शिक्षक शनिवारी या मोर्चात मोठ्यासंख्येने सहभागी होऊन त्यांनी जोरदार निदर्शने केली. यात महिला शिक्षक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. मात्र त्यांचे निवेदन स्विकारण्यास जिल्हाधिकारी कार्यालयास अधिकारीच नसल्यामुळे या शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षकांवर हा अन्याय झाल्याचे काही शिक्षकांमध्ये बोलले जात आहे. या शिक्षकांचे शिष्टमंडळ सोमवारी जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देणार असल्याचे मोर्चातील एका शिक्षक नेत्याने लोकमतला सांगितले.
निवडश्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणीच्या जाचक अटींचा शासन निर्णय रद्द करावा, शिक्षकाना करावी लागणारी आॅनलाइनची कामे तत्काळ बंद करावी, केंद्र पातळीवर डेटा एंट्री आॅपरेटरची नियुक्ती करावी, २००५नंतर च्या शिक्षकाना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांना इच्छुकतेनुसार बदली मिळावी, २७ फेब्रुवारीचा शासन निर्णयात दुरूस्त्या व सुधारणा कराव्यात आदी मागण्यांसाठी शिक्षकांनी या मोर्चाचे आयोजन करून जोरदार निदर्शने केली. शिक्षकाच्या या समन्वय समितीमध्ये जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघ, राज्य प्रा. शि. समिती, स्वाभिमान शि. संघटना, शिक्षक सेना, पदवीधर प्रा. शि. व केंद्र प्रमुख संघटना, कास्ट्राईब शि. सं., शिक्षक भारती, प्रा. शि. परिषद, मागासवर्गीय शि. सं., केंद्रप्रमुख सं., उर्दु शि. सं., आदी शिक्षक संघटनांचा समावेश होता.
 

Web Title: Thane Selection - Teacher's Front Against Senior Pay Scale; However, the closure of the Collector Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.