नायजेरियन न्यायबंदीची न्यायालयाच्या आवारात ठाणे पोलीस हवालदारास धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 07:37 PM2017-12-23T19:37:21+5:302017-12-23T19:40:12+5:30

नशेसाठी एमडी असो या गांजा यासारखे अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे विविध कारवायांमध्ये समोर येत आहे. त्यामध्ये परदेशी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसत आहे.

Thane police raid on Nigerian jurisdiction court premises scuffle | नायजेरियन न्यायबंदीची न्यायालयाच्या आवारात ठाणे पोलीस हवालदारास धक्काबुक्की

नायजेरियन न्यायबंदीची न्यायालयाच्या आवारात ठाणे पोलीस हवालदारास धक्काबुक्की

Next
ठळक मुद्देसरकारी कामात अडथळाप्रकरणी गुन्हा दाखलत्या नायजेरियनला २०१५ मध्ये झाली होती अटक

ठाणे : लघुशंकेकरिता खालच्या मजल्यावरील बाथरूममध्ये जाऊ, असे सांगितले. याचाच राग मनात धरून एका नायजेरियन न्यायबंदीने ठाणे न्यायालयाच्या आवारात गोंधळ घालून पोलीस हवालदारास धक्काबुक्की केली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विल्यम फ्रॅक ऊर्फ फ्रॅर्कविल विल्यम या नायजेरियन न्यायबंदीविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली.
विल्यम याला अमली पदार्थ तस्करीप्रकरणी ठाणे अमली पदार्थविरोधी पथकाने २०१५ साली अटक केली होती. त्या गुन्ह्यात तो सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी आहे. शुक्रवारी दुपारी त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यासाठी ठाणे शहर मुख्यालयाचे पोलीस हवालदार विष्णू बर्डे घेऊन आले. याचदरम्यान, बर्डे यांच्याकडे विल्यमने लघुशंकेकरिता जायचे आहे, असे सांगितले. त्या वेळी बर्डे यांनी दुसºया मजल्याऐवजी खालच्या मजल्यावरील बाथरूममध्ये जाऊ, असे सांगितले. त्याचाच राग मनात धरून विल्यम याने मोठमोठ्याने आरडाओरड करून गोंधळ घातला. तसेच बर्डे यांच्याशी हुज्जत घालून त्यांची कॉलर पकडली आणि त्यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी बर्डे यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विल्यम याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.व्ही. धर्माधिकारी यांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी.पी. ढवळे तपास करत आहेत.



 

Web Title: Thane police raid on Nigerian jurisdiction court premises scuffle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.