ठामपात नोकरीच्या आमिषाने अनेकांना गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:10 AM2018-10-18T00:10:23+5:302018-10-18T00:10:25+5:30

कासा : डहाणू तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार आदीवासी तरुणांना ठाणे महानगर पालिकेमध्ये नोकरी लावून देतो असे सांगून ३ आदिवासी तरुणांना ...

thane municiple corporation fake job loot | ठामपात नोकरीच्या आमिषाने अनेकांना गंडविले

ठामपात नोकरीच्या आमिषाने अनेकांना गंडविले

googlenewsNext

कासा : डहाणू तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार आदीवासी तरुणांना ठाणे महानगर पालिकेमध्ये नोकरी लावून देतो असे सांगून ३ आदिवासी तरुणांना प्रत्येकी ३ लाखाप्रमाणे ९ लाखाचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे.
या तालुक्यातील कळमदेवी येथील शैलेश धाकट भोये, कासा येथील संतोष शामनारायण यादव, विक्रमगड तालुक्यातील कवडास येथील दिनेश विष्णू कवटे अशा तीन बेरोजगार तरुणांना ठाणे महानगरपालीकेत शिपाई पदावर तीन महिन्यात नौकरीस लावतो असे सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी तीन लाख रुपये उकळून बनावट नियुक्ती पत्र, ओळखपत्र देऊन पैसे घेत व तशी वचन चिठ्ठी (हमीपत्र) लिहून एकूण तीन जणांनकडून ९ लाख रु पये घेतले आहेत याबाबत फसवणूक झालेल्यांनी डहाणू शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोईर यांना याची माहिती दील्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबतची माहिती दिली.
त्यानंतर आरोपी सागर शशिकांत घुटे, रा भोवाडी (धरमपूर), जयवंत अर्जुन खोटरे रा.ठाणे पातलीपाडा, उतम लिंबाजी मोरे रा. चिरागनगर ठाणे, अंकुश शशिकांत घुटे भोवाडी (धरमपूर), सविता कांबळे रा.ठाणे अशा पाच आरोपीपैकी ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे यातील अंकुश घुटे हा बेरोजगार मुलांना शोधून देतो तर सागर घुटे पैसे वसुली करून जयवंत कोठरे यांच्याकडे नेऊन देण्याचे काम करीत होता यातून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे तर जिल्यात असे एकूण १५ मुलांची फसवणूक झाली असल्याची शक्यता आहे.

Web Title: thane municiple corporation fake job loot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.