ठाणे महापालिकेचा वर्धापन सोहळा यंदाही वादाग्रस्त ठरण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 05:35 PM2017-10-03T17:35:35+5:302017-10-03T17:35:58+5:30

मागील वर्षी वादग्रस्त ठरलेला ठाणे महापालिकेचा वर्धापन सोहळा यंदाही वादाग्रस्त ठरणार असल्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी ठाणे भूषण, गौरव, गुणीजन अशा पुरस्कारांची खिरापतच वाटण्यात आली होती. यामध्ये अनेक नगररेसवकांनी आपल्या कार्यकर्त्यांची शिफारस केल्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता.

Thane Municipal Corporation's Anniversary celebrations show signs of annihilation | ठाणे महापालिकेचा वर्धापन सोहळा यंदाही वादाग्रस्त ठरण्याची चिन्हे

ठाणे महापालिकेचा वर्धापन सोहळा यंदाही वादाग्रस्त ठरण्याची चिन्हे

Next

ठाणे - मागील वर्षी वादग्रस्त ठरलेला ठाणे महापालिकेचा वर्धापन सोहळा यंदाही वादाग्रस्त ठरणार असल्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी ठाणे भूषण, गौरव, गुणीजन अशा पुरस्कारांची खिरापतच वाटण्यात आली होती. यामध्ये अनेक नगररेसवकांनी आपल्या कार्यकर्त्यांची शिफारस केल्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यामुळे यंदा अशा पुरस्कारांची खिरापत कमी करण्याचा निर्णय महापौर मीनाक्षी शिंदे यांनी घेतला आहे. परंतु असे असतांना देखील अनेक नगरसेवकांनी जे लायक नाहीत, अशांना पुरस्कार मिळावेत म्हणून शिफारसी केल्या आहेत. त्यामुळे यंदा देखील पालिकेचा वर्धापन दिन या पुरस्कारांच्या निमित्ताने वादादीत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
    ठाणो महापालिकेचा 35 वा वर्धापन दिन सोहळा बुधवारी गडकरी रंगायतन येथे पार पडणार आहे. परंतु यंदा पुन्हा पालिकेकडून दिल्या पुरस्काराच्या मुद्यावरुन हा वर्धापन दिनात पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. महापौर कार्यालयाकडे पुरस्कारासाठी लेखी शिफारशींचा खच पडू लागला आहे. यामध्ये नगरसेवकांनी शिफारस केलेल्या इच्छुकांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या एका नव्या दमाच्या नगरसेवकाने आपल्या पित्याला ठाणे भुषण पुरस्कार मिळावा म्हणून स्वत:च शिफारस केल्याचे पत्र महापौरांना दिले आहे. याशिवाय इतर गोंधळ आहे तो आहेच, मागील तीन दिवसांपासून अशा प्रकारे महापौर कार्यालयात शिफारशींचा पाऊस पडत आहे. परंतु याला नियमावली मात्र काहीच नाही, केवळ शिफारसी दिल्या जात आहेत. परंतु प्रत्यक्षात ज्या व्यक्तींची शिफारस केली जात आहे. त्या व्यक्तींची कोणतीही परिपूर्ण माहिती अथवा बायोडेटा मात्र जमा केला जात नाही. त्यामुळे एकूणच ठाणे गुणीजन पुरस्कार हे वादात सापडले आहेत. आपल्या कार्यकर्त्यांचे समाधान व्हावे म्हणूनही काही नगरसेवकांनी शिफारसी केल्याचे दिसत आहे. 
    मागील वर्षी तर अनेक जणांना अशा प्रकारे ठाणे गौरव आणि ठाणे गुणीजन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. शिफारस देण्याची शेवटची तारीख उलटून गेली असतांनाही अगदी कार्यक्रम सुरू होण्यापर्यंतच्या वेळेआधी देखील शिफारसी दिल्या जात असल्याचा मुद्दा मागील वर्षी चांगलाच गाजला होता.
    प्रत्यक्षात ठाणे भूषण, गौरव, विशेष आणि गुणीजन हे मानाचे पुरस्कार समजले जात आहेत. त्यामुळे असे पुरस्कार देतांना त्यांची संख्या किती असावी, याची मर्यादा असणो गरजेचे आहे. पुरस्कार देतांना त्या व्यक्तीचे कार्य पाहणो महत्वाचे आहे, यासाठी एका ज्युरी टीमची नेमणूक होणो देखील महत्वाचे आहे. परंतु तसे काहीही घडत नसून या पुरस्कारांचा अवमान करण्याचे काम राजकीय मंडळींकडून केले जात आहे. त्यामुळे याला पायबंद घालण्याची गरज आता निर्माण झाली असून तशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 
 
एकीकडे नको त्या मंडळींची शिफारस केली जात असतांना आणि जे या पुरस्कारांसाठी पात्र नसतांना अशांना हे पुरस्कार दिले जात आहेत. परंतु दुसरीकडे जे खरोखर या पुरस्कारासाठी पात्र अशांना मात्र डावलले जात असल्याची खंत व्यक्त होत आहे. ठाण्यातील लीला श्रोती यांना ठाणो भूषण अथवा गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकाने शिफारस पत्र दिले आहे. विशेष म्हणजे यामध्ये श्रोती यांनी केलेले संपूर्ण कार्य देखील त्यांनी विषद केले आहे. श्रोती या शिक्षिका असून, वयाच्या 90 व्या वर्षी देखील बाह्यपरिक्षांची भूमिका बजावत असून, त्यांच्या तालमीत संस्कृतमध्ये अनेकांनी प्रतितयश संपादन केले आहे. काही संस्थांनी देखील त्यांचा नुकताच गौरव केला आहे. परंतु मिळालेल्या माहिती नुसार या शिक्षिकेला मात्र वादादीत ठरत असलेला आणि खिरापत म्हणून वाटप केला जात असलेला ठाणो गुणीजन पुरस्कार देऊन बोळवण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Web Title: Thane Municipal Corporation's Anniversary celebrations show signs of annihilation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.