ठाणे कारागृहातील बंद्यासाठी स्मार्टकार्ड दूरध्वनी सुविधा, ई मुलाखत युनिटचे उद्घाटन

By सुरेश लोखंडे | Published: March 12, 2024 07:34 PM2024-03-12T19:34:04+5:302024-03-12T19:34:27+5:30

Thane News: ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये बंद्याकरीता स्मार्टकार्ड दुरध्वनी सुविधा,वॉशिंग मशिन, दुरदर्शन संच,ई मुलाखत युनिट इत्यादीचे उदघाटन व आयुष्यमान भारत कार्ड, श्रमीक कार्ड चे वितरण पोलीस महासंचालक (निवृत्त) अहमद जावेद, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवाचे अमिताभ गुप्ता,आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आले.

Thane: Inauguration of Smart Card Telephone Facility, E-Interview Unit for Bandya in Thane Jail | ठाणे कारागृहातील बंद्यासाठी स्मार्टकार्ड दूरध्वनी सुविधा, ई मुलाखत युनिटचे उद्घाटन

ठाणे कारागृहातील बंद्यासाठी स्मार्टकार्ड दूरध्वनी सुविधा, ई मुलाखत युनिटचे उद्घाटन

- सुरेश लोखंडे 
 ठाणे - ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये बंद्याकरीता स्मार्टकार्ड दुरध्वनी सुविधा,वॉशिंग मशिन, दुरदर्शन संच,ई मुलाखत युनिट इत्यादीचे उदघाटन व आयुष्यमान भारत कार्ड, श्रमीक कार्ड चे वितरण पोलीस महासंचालक (निवृत्त) अहमद जावेद, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवाचे अमिताभ गुप्ता,आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आले. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक राणी भोसले, आणि इतर अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.

येथाील कारागृहात क्षमतेपेक्षा सरसरी पेक्षा जास्त बंदी दाखल असल्याने प्रचलित सुविधा देण्यात मर्यादा येत होत्या. काळानुरुप आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन कारागृहातील सर्वांना बंद्यांना त्याच्या कुटुंबियांशी,वकीलाशी संवाद साधण्याच्या प्रचजित धाेरणात व तंत्रज्ञानात, सुविधांमध्ये सुधारणा या सुविधा उपलब्ध करून देत त्यांचे आज उद!घाटन करण्यात आले. या ठाणे मध्यवर्ती कारागृहात सध्यसिथतीत सरासरी चार हजार २०० पुरुष बंदी व १३३ महिला बंदी दाखल आहेत. सर्व विभागातील बॅरेक च्या बाहेरील बाजूस ॲलन ग्रुप,कंपणी द्वारे २० नग स्मार्टकार्ड दुरध्वनी संच बसविण्यात येऊन फोन सुविधे करीता आवश्यक स्मार्ट कार्ड पुरविण्यात आलेले आहे. स्मार्टकार्ड मध्ये बंद्यांचे नातेवाईक व वकील यांचे एकूण तीन फोन क्रमांक जतन केलेले असतील त्या मोबाईल क्रमांकावरच बंदी स्मार्टकार्डद्वारे कॉल करु शकनार आहेत. स्मार्टकार्डच्या माध्यमातून ज्या बंद्यांच्या फोन नंबरची पडताळणी झालेली आहे,अशा सर्व बंद्यांना आठवडयातून तीनवेळा प्रत्येकी सहा मिनीटे देण्यात येणार आहेत. फोन सुविधेकरीता बंद्यांना प्रति मिनीट एक रुपये प्रमाणे शुल्क ठेवण्यात आलेले आहे.स्मार्टफोन सुविधेमुळे बंद्यांना त्यांच्या कुटुंबियांशी व वकीलशी संवाद साधण्यात सुलभता येऊन बंद्यांना निश्चित फायदा होणार आहे.

कारागृहातील बंद्यांना कपडे स्वच्छेकरीता मुख्यालयाकडुन बंद्यांचे स्वत:चे वापराचे कपडे धुण्यासाठी पाच नग वॉशिंग मशीन व कपडे सुकविण्याकरीता पाच ड्रायर मशीन पुरविण्यात आलेले आहेत. कारागृहात दाखल असलेल्या बंद्यांचे मनोरंजनोकरीता टि.व्ही. सुविधेमध्ये दुरदर्शन चॅनेलशिवाय चार वेगवेगळे स्पोर्ट चॅनेल तसेच मराठी ,हिंदी ,इंग्रजी बातम्यांचे प्रत्येकी चार चॅनेल, ॲनिमल प्लॅनेट इ. चॅनेल सुरु करणेस परवानगी देण्यात आलेली आहे.त्यानुसार ठाणे मध्यवर्ती कारागृहास, एकूण ३८ नग दुरदर्शन संच पुरवठा करण्यात आलेला आहे. ज्या बंद्यांचे नातेवाईक प्रत्यक्ष भेटी करीता येऊ शकत नाही अशा बंद्यां करीता ई मुलाखत सुविधा सुरु करण्यात आलेली आहे, ई मुलाखत करीता १० व्ही.सी.संच कार्यान्वयित करण्यात आलेले आहेत.यार सुविधेमार्फत बंद्यांना नातेवाईक भेटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तर भारत सरकारची आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कारागृहातील पात्र बंद्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत रुपये पाच लक्ष पर्यंत वैद्यकीय उपचार कवच उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.सदर योजनेअंर्गत लाभार्थी बंद्यांना आयुष्मान भारत कार्ड चे वाटप करण्यात आले.

Web Title: Thane: Inauguration of Smart Card Telephone Facility, E-Interview Unit for Bandya in Thane Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.