कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे दोन साथीदार ताब्यात, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 22:33 IST2017-09-25T20:34:33+5:302017-09-25T22:33:59+5:30

बिल्डरकडून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.  ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली आहे. 

Thane Crime Investigation Department takes control of two notorious Dawood Ibrahim | कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे दोन साथीदार ताब्यात, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे दोन साथीदार ताब्यात, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

ठाणे -   बिल्डरकडून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली आहे. 

खंडणी प्रकरणामध्ये दाऊद इब्राहिमच्या दोन साथीदारांचा खंडणी प्रकरणातील सहभाग चौकशीमध्ये उघडकीस आला आहे. त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा दिली. या दोन साथीदारांमध्ये एका महिलेचा समावेश असल्याची माहिती सुत्रंनी दिली. त्यांच्या संपर्कातील एका संशयिताची चौकशी पोलिसांनी रात्री केली. या चौकशीतून मिळणा:या माहितीवर पुढील कारवाई अवलंबून राहणार आहे. दाऊदच्या साथीदारांच्या अटकेची कारवाई रात्री उशिरा होण्याची शक्यतादेखील सुत्रांनी व्यक्त केली.

एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासह तिघांना ठाणे पोलिसांनी गेल्या सोमवारी मुंबईतून अटक केली होती. आठ दिवसांच्या पोलीस कोठडीत असलेल्या इक्बालची खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा चौकशी करत आहेत. 

 

Web Title: Thane Crime Investigation Department takes control of two notorious Dawood Ibrahim