ठाण्यात शिवसेना शाखेसमोरच्या 18 दुचाकी पेटविल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 09:55 IST2018-12-25T09:20:29+5:302018-12-25T09:55:46+5:30

पहाटे 2.36 वाजता ही आग लावण्यात आली.

In Thane 18 bikes set ablaze in front of the Shiv Sena branch | ठाण्यात शिवसेना शाखेसमोरच्या 18 दुचाकी पेटविल्या

ठाण्यात शिवसेना शाखेसमोरच्या 18 दुचाकी पेटविल्या

ठाणे : ठाण्यातील पाचपाखाडी भागातील शिवसेनेच्या शाखेसमोर उभ्या करण्यात आलेल्या 18 दुचाकींना अज्ञातांनी आग लावली. आज पहाटे 2.36 वाजता ही आग लावण्यात आली.




 दुचाकींना आग लावल्याचे समजताच स्थानिकांनी घरातील पाणी मारून दुचाकींची आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर अग्निशामन दल दाखल झाले. यानंतर आग विझविण्यात यश आले. तोपर्यंत 18 दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. 

 

ही घटना चंदनवाडीतील अल्मेडा रोडवरील हनुमान सोसायटीसमोर घडली. दुचाकी पेटविणाऱ्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

Web Title: In Thane 18 bikes set ablaze in front of the Shiv Sena branch