दाऊदचा हस्तक तारिक परवीनला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 05:49 PM2018-04-27T17:49:41+5:302018-04-27T17:49:41+5:30

प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्त्वातील खंडणी विरोधी पथकाने गुरूवारी उशिरा रात्री दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार तारिक परवीन याला २0 वर्षांपूर्वीच्या मुंब्रा येथील एका खून प्रकरणामध्ये अटक केली.

Tariq Parveen, Dawood's close aide, arrested by Thane Anti Extortion Cell | दाऊदचा हस्तक तारिक परवीनला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक

दाऊदचा हस्तक तारिक परवीनला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक

Next
ठळक मुद्देमुंबईत ठोकल्या बेड्यामुंब्रा येथील खून प्रकरणामध्ये होता फरार१ मेपर्यंत पोलीस कोठडी

ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक तारिक परवीन याला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने गुरूवारी रात्री मुंबईतून अटक केली. २0 वर्षांपूर्वी मुंब्रा येथे झालेल्या एका खून प्रकरणामध्ये तो फरार होता.
साधारणत: २0 वर्षांपूर्वी केबल व्यवसाय तेजीत होता. या व्यावसायिक स्पर्धेतून ३१ आॅगस्ट १९९८ रोजी मुंब्रा येथील केबल व्यावसायिक मोहम्मद सिद्दीकी मोहम्मद उमर बांगडीवाला यांचा भाऊ मोहम्मद इब्राहिम यांची एका टोळीने गोळ्या झाडून हत्या केली होती. एक गोळी रोशन आरा नावाच्या १३ वर्षाच्या मुलीला चुकून लागल्याने तीदेखील जखमी झाली होती. मुंब्रा पोलिसांनी याप्रकरणी तारिक परवीनसह सात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. तारिक वगळता सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटकादेखील केली होती. या प्रकरणाच्या आरोपपत्रामध्ये तारिक परवीनला फरार दाखविण्यात आले होते. या घटनेला जवळपास २0 वर्षे उलटल्यानंतर ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने गुरूवारी रात्री १२.३0 वाजताच्या सुमारास तारिकला मुंबईतील एल.टी. रोडवरील अशोका शॉपिंग सेंटरमधून अटक केली. गेल्या काही वर्षांपासून तो रियल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रात कार्यरत होता. मुंबई पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अशोका शॉपिंग सेंटरमध्ये त्याने कार्यालय थाटले होते. खंडणी विरोधी पथकाने त्याला मुंब्रा पोलिसांच्या स्वाधीन केले. खुनाच्या गुन्ह्यामध्ये ठाणे न्यायालयाने त्याला १ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि विकास घोडके, पोलीस उपनिरीक्षक हेमंत ढोले, विकास बाबर, विलास कुटे, संदेश गावंड, प्रशांत भुरके यांनी ही कामगिरी केली.

Web Title: Tariq Parveen, Dawood's close aide, arrested by Thane Anti Extortion Cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.