मीरा भाईंदर महापालिकेच्या मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा जोरदार प्रतिसाद

By धीरज परब | Published: October 4, 2023 07:44 PM2023-10-04T19:44:10+5:302023-10-04T19:44:20+5:30

६० ते ७५ वयोगटातील ६० ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग

Strong response from senior citizens in Mira Bhayander Municipal Marathon | मीरा भाईंदर महापालिकेच्या मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा जोरदार प्रतिसाद

मीरा भाईंदर महापालिकेच्या मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा जोरदार प्रतिसाद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा भाईंदर महापालिकेने आयोजित केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या मॅरेथॉन स्पर्धेत ६० ते ७५ वयोगटातील ६० ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला . ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह पाहून आयुक्तांसह अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांच्या सोबत धावण्याचा मोह आवरता आला नाही . महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्या उपस्थितीत बुधवारी भाईंदरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदाना लगत ज्येष्ठ नागरिकांची मॅरेथॉन संपन्न झाली .   बोस मैदान ते राधास्वामी सत्संग मार्ग व पुन्हा बोस मैदान अशी ३  किमीची हि मॅरेथॉन होती.

यावेळी आयुक्त काटकर सह  अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त कल्पिता पिंपळे, रवि पवार, नगरसचिव वासुदेव शिरवळकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी राज घरत, समाजविकास अधिकारी दिपाली पोवार सह माजी नगरसेवक सुरेश खंडेलवाल आदी उपस्थित होते. मॅरेथॉन मध्ये पहिला क्रमांक निरंजन सरकार यांनी पटकावला . द्वितीय क्रमांक सालिक गुप्ता व तृतीय क्रमांक अशोक शर्मा ठरले . आयुक्तांनी विजेत्यांना पदकं देऊन सन्मानित केले . विमा परवाल, इंदू गोसाई व ॲलेन डिसोझा या तीन ज्येष्ठ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याने त्यांचा विशेष सन्मान केला. 

स्पर्धा सुरू होण्याआधी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक ठेवले होते . अग्निशमन दलाचे पथक सुद्धा होते . ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून पालिका समाजविकास विभागामार्फत हा उपक्रम राबवण्यात आला.

Web Title: Strong response from senior citizens in Mira Bhayander Municipal Marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.