ठाण्यातील वाचक कट्टयावर मिलिंद बोकील लिखित "पतंग" कथेचे अभिवाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 03:23 PM2018-12-01T15:23:00+5:302018-12-01T15:24:57+5:30

वाचक कट्टयावर मिलिंद बोकील लिखित "पतंग" कथेचे अभिवाचन करण्यात आले. 

The speech of the "Kite" story written by Milind Bokil on Kattya, a reader in Thane | ठाण्यातील वाचक कट्टयावर मिलिंद बोकील लिखित "पतंग" कथेचे अभिवाचन

ठाण्यातील वाचक कट्टयावर मिलिंद बोकील लिखित "पतंग" कथेचे अभिवाचन

googlenewsNext
ठळक मुद्देवाचक कट्टयावर मिलिंद बोकील लिखित "पतंग" कथेचे अभिवाचनअभिवाचनाच्या माध्यमातून पतंगावर भाष्यपतंग कथेचे अभिवाचान करत प्रेक्षकांची जिंकली मने

ठाणेप्रत्येकाने आपल्या लहानपणी वेडावाकडा का होईना पण पतंग बदवलेला असतो.पतंगीच्या अनेक आठवणी आपणास बालपणात घेऊन जातात. वाचक कट्टयावर अभिवाचनाच्या माध्यमातून पतंगावर भाष्य करण्यात आले.२५ क्रमांकाच्या वाचक कट्टयावर स्वप्निल फडके,संदीप लबडे आणि अथर्व नाकती यांनी मिलिंद बोकिल लिखित पतंग कथेचे अभिवाचान करत प्रेक्षकांची मने जिंकली.

    एका गच्चीवर दोन मित्र पतंग उडवण्यासाठी नेहमी भेटतात.त्यातील मोठा मित्र छोट्या मित्राला पतंग कशी उडवायची,मांजाने पतंग कशी कापायची,धाग्याला योग्यवेळी ढील द्यायची,पतंग गोता खायला लागल्यावर कशी टिचकी मारायची हे समजावत असतो. छोटा मित्र देखील त्याचा एक एक अनुभव ऐकत असतो.खरतर पतंग आणि आयुष्य यांची उत्तम सांगड लेखक मिलिंद बोकील यांनी या कथेत मांडली आहे. तसेच यावेळी ओमकार मराठे,सहदेव साळकर,शुभम कदम यांनी चि वि जोशी लिखित महादू कडी लाव बेटा या कथेचे अभिवाचन केले.सहदेव कोळंबकर याने मध्यरात्री हि कथा वाचली,शुभांगी भालेकर यांनी पूल देशपांडे लिखित खाण्याविषयी थोडंसं हि कथा वाचली,माधुरी कोळी यांनी देण्याचं महत्व हि कथा वाचली,उत्तम ठाकूर यांनी शेवटी संस्काराने मात केली हि कथा वाचली,रिक्मिणी कदम यांनी क्षणभर विश्रांती हि कथा वाचली.  यावेळी कट्ट्याचे निवेदन कुंदन भोसले याने केले,दीपप्रज्वलन मनीषा शितुत यांनी केले. पतंग कथेचे अभिवाचन ऐकून आम्हाला अतिशय आनंद झाला, वाचक कट्टयावर नेहमीच वेगवेगळ्या विषयांची मेजवानी आम्हाला मिळते असे एका जेष्ठ प्रेक्षकाने सांगितले.

Web Title: The speech of the "Kite" story written by Milind Bokil on Kattya, a reader in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.