वाचक कट्टयाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, चल आपुलेच असणे आता दुरून पाहुचे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 03:27 PM2018-11-24T15:27:43+5:302018-11-24T15:29:04+5:30

चल आपुलेच असणे आता दुरून पाहुचे वाचक कट्टयावर सादरीकरण करण्यात आले. 

Audiences' spontaneous response to the reader's sketch | वाचक कट्टयाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, चल आपुलेच असणे आता दुरून पाहुचे सादरीकरण

वाचक कट्टयाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, चल आपुलेच असणे आता दुरून पाहुचे सादरीकरण

Next
ठळक मुद्देवाचक कट्टयावर रसिकांना दर्जेदार सादरीकरणाची मेजवानीचल आपुलेच असणे आता दुरून पाहुचे सादरीकरणवाचक कट्टयाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणेवाचक कट्टयावर रसिकांना दिवसेंदिवस दर्जेदार सादरीकरणाची मेजवानी मिळत आहे. त्यातच भर पडली आहे ती मैत्र कलामंच यांच्या चल आपुलेच असणे आता दुरून पाहू या सादरीकरणाची. वाचक कट्टयावर हा कार्यक्रम सादर झाला व यातील कलाकारांनी उपास्थितांची मने जिंकली.

    आपण जन्म घेतो,अनेक नवनवीन गोष्टी आपल्या आयुष्यात येतात.काही गोष्टी आपल्यातल्या माणसाशी आपली पुन्हा भेट घालून देतात.तर काही गोष्टी आपल्याला आपल्या पासूनच दूर करतात.पण मग हीच ती वेळ असू शकते पुन्हा उभं राहण्याची,नव्या आशेने आयुष्याकडे पाहण्याची.स्वतः सोबत आपल्या भोवतीच्या माणसांना ओळखण्याचा आणि नात्यांना जाणून घेण्याचा या कार्यक्रमाचा अट्टाहास होता.  आपल्याला नेहमी तेच दिसते जे अपल्याला पाहायचे असते,पण त्याही पलीकडे विश्व आहे,स्वभाव,वैशिष्ट आहेत मत आहे,मन आहे आणि कदाचित ती जाणण आपल्याकडून अपूर्ण राहतं असे या सादरीकरणाच्या माध्यमातून मांडण्यात आले. यात पूल देशपांडे,सुरेश भट,संदीप खरे,स्पृहा जोशी,सलील कुलकर्णी या साहित्यिकांच्या साहित्यावर अधारित अभिवाचन करण्यात आले. मैत्र संस्थेच्या संजना पाटील,कल्पेश देवरूखकर,श्रुती पाटील,धनश्री परब या कलाकारांनी अभिवाचन केले. तसेच यावेळी अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी देखील अभिवाचन केले.सहदेव कोळंबकर याने भ्रमण मंडळ,न्यूतन लंके हिने गाठोडं,उत्तम ठाकूर यांनी एटिकेट, रोहिणी राठोड यांनी सोन्याचं पिंपळपान, शुभांगी भालेकर यांनी पत्र भाईंसाठी  इत्यादि  पुलं लिखित साहित्याचे अभिवाचन केले. यावेळी निवेदन माधुरी कोळी यांनी केले,दीपप्रज्वलन नंदिनी पाटील यांनी केले., 

Web Title: Audiences' spontaneous response to the reader's sketch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.