कोपरीत आदिवासी मुलींच्या वसतीगृहात कोसळला स्लॅब; एकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 14:21 IST2019-03-26T14:19:42+5:302019-03-26T14:21:14+5:30
जखमी तरुणी ही एम. एससीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे.

कोपरीत आदिवासी मुलींच्या वसतीगृहात कोसळला स्लॅब; एकजण जखमी
ठाणे - कोपरीतील आदिवासी मुलींच्या वसतीगृहाचा स्लँब कोसळल्याने एक मुलगी जखमी झाली आहे. त्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. या अपघातात जखमी झालेल्या कांचन मोरे हा तरुणीला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमी तरुणी ही एम. एससीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे.
ठाणे : कोपरी येथील आदिवासी मुलींच्या वसतीगृहाचा स्लॅब कोसळला, एक मुलगी जखमी https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 26, 2019