शिवसेना-भाजपा पुन्हा समोरासमोर, रस्ते कामाला आधीच मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 04:06 AM2017-09-27T04:06:57+5:302017-09-27T04:07:11+5:30

रस्त्याच्या श्रेयासाठी शिवसेना व सत्ताधारी भाजपा आघाडी आमने-सामने आली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले.

Shiv Sena-BJP re-approval, work on roads already approved | शिवसेना-भाजपा पुन्हा समोरासमोर, रस्ते कामाला आधीच मंजुरी

शिवसेना-भाजपा पुन्हा समोरासमोर, रस्ते कामाला आधीच मंजुरी

Next

उल्हासनगर : रस्त्याच्या श्रेयासाठी शिवसेना व सत्ताधारी भाजपा आघाडी आमने-सामने आली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. मात्र भूमिपूजनाची कुणकूण लागताच शिवसेनेने दोन दिवसापूर्वी भूमिपूजन करून भाजपावर कुरघोडी केली. सरकारचा २० कोटीचा निधी व कामाला मंजुरी असताना महापालिकेने सहा महिने उशिराने रस्त्याचे काम का सुरू केले? अशी टीका शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केली आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुकी दरम्यान तत्कालिन स्थायी समिती सभापती सुनील सुर्वे यांनी चार रस्त्यासह इतर प्रस्तावांना मंजुरी दिली होती. महापालिका निवडणुकीनंतर मंजुरी दिलेल्या, व्हीटीसी ग्राऊंड ते मानेरे रस्ता, नेहरू चौक ते फॉरवर्ड लाईन चौक, काजल पेट्रोलपंप ते विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक, जिजामाता ते उल्हासनगर स्थानक आदी चार रस्त्यांचे काम पावसाळयापूर्वी होणे गरजेचे होते. मात्र विकासकामात सत्ताधारी भाजपाने राजकारण आणून श्रेयासाठी जाणीवपूर्वक रस्त्याचे काम रखडल्याचा आरोप चौधरी यांनी केला. भूमिपूजनाची कुणकूण शिवसेनेला लागताच त्यांनी दोन दिवसांपूर्वी भूमिपूजन उरकून घेतले.
महापालिकेने जाहीर केलेल्या कार्यक्रमाप्रमाणे याच रस्त्यांचे भूमिपूजन मंगळवारी राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, स्थायी समिती सभापती कंचन लुंड, आयुक्त राजेंद्र निंबाळकर, अतिरीक्त आयुक्त विजया कंठे, उपायुक्त संतोष देहरकर, शहर अभियंता राम जैस्वाल यांच्या हस्ते झाले.

निधी बँकेमध्ये पडून
शिवसेनेच्या प्रयत्नातून राज्य सरकारने ६ महिन्यांपूर्वी ४ मुख्य रस्त्यांसाठी २० कोटीचा निधी दिला. व्हीटीसी ते मानेरे रस्त्यासाठी साडेचार कोटी, काजल पट्रोलपंप ते विठ्ठलवाडी स्थानक रस्ता ५ कोटी, नेहरू चौक ते फॉरवर्ड लाईन रस्त्यासाठी ६ कोटी तर जिजामाता ते स्थानक रस्त्यासाठी ५ कोटी असा एकूण २० कोटीचा निधी दिला आहे. मात्र निधीचा उपयोग वेळीच न केल्याने तो बँकेत पडून राहिला, अशी टीका शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केली.

Web Title: Shiv Sena-BJP re-approval, work on roads already approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.