पालिका रुग्णालयात अ‍ॅण्टी रेबिजचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:36 AM2018-01-18T00:36:30+5:302018-01-18T00:36:34+5:30

सरकारचा औषधे पुरवणा-या कंत्राटदारासोबतचा दरकरार संपला असल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेच्या रुग्णालय व आरोग्य केंद्रात अ‍ॅण्टी रेबिज लसचा साठा संपुष्टात आला आहे

The scarcity of the anti-regime in the municipality hospital | पालिका रुग्णालयात अ‍ॅण्टी रेबिजचा तुटवडा

पालिका रुग्णालयात अ‍ॅण्टी रेबिजचा तुटवडा

Next

धीरज परब 
मीरा रोड : सरकारचा औषधे पुरवणा-या कंत्राटदारासोबतचा दरकरार संपला असल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेच्या रुग्णालय व आरोग्य केंद्रात अ‍ॅण्टी रेबिज लसचा साठा संपुष्टात आला आहे. परिणामी, कुत्रा चावल्यास नागरिकांना खाजगी दवाखान्यातून जास्त पैसे मोजून लस घ्यावी लागत आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेची भार्इंदर येथे भीमसेन जोशी रुग्णालय, तर मीरा रोड येथे इंदिरा गांधी अशी दोन रुग्णालये आहेत. तर, शहरात सध्या ८ आरोग्य केंद्रे व २ उपकेंदे्र आहेत. सरकारच्या यादीवरील श्री जी इंटरनॅशनल या कंत्राटदाराकडून पालिका अ‍ॅण्टी रेबिज लसची खरेदी १३७ रुपये दराने करते. तीच लस औषधांच्या दुकानांमध्ये ३५० रुपयांना मिळते. तर, दवाखान्यात त्यापेक्षा अधिक शुल्क घेतले जाते.
गेल्या वर्षीच जुलैदरम्यान सरकारचा औषध पुरवठादारांसोबतचा दरकरार संपुष्टात आला. सरकारने नवीन पुरवठादारांची नियुक्ती केली नाही, शिवाय जुन्यांना मुदतवाढही दिली नाही, जेणेकरून पुरवठादारांनी औषधे पुरवणे थांबवले आहे. याचा फटका कुत्रा चावणाºया नागरिकांना बसला आहे.
शहरातील दोन्ही रुग्णालये व सुमारे १० आरोग्य केंद्रांमध्ये अ‍ॅण्टी रेबिज लसीचा साठाच संपुष्टात आला आहे. त्यामुळे कुत्रा चावल्यास पालिका रुग्णालय वा आरोग्य केंद्रात जाणाºया नागरिकांना लस नसल्याचे सांगून परत पाठवले जाते. सुमारे १५ दिवसांपासून रुग्णालय व आरोग्य केंद्रात लसच मिळत नसल्याने नागरिकांना खाजगी दवाखान्यात जाऊन अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.
पालिकेला दरवर्षी सुमारे १५ हजार लसीची गरज असते. पालिकेने गेल्या वर्षी १० हजार लसपुरवठा करण्याचे कार्यादेश कंत्राटदार श्री जी इंटरनॅशनलला दिले होते. पण, कंत्राटदाराने तीन टप्प्यांत केवळ ६ हजार ३०० लस पुरवल्या. सरकारकडून नवीन दरकरार होत नसल्याने लसपुरवठ्यासह उत्पादनावरही परिणाम झाला आहे. लसचा तुटवडा भासण्याची शक्यता पाहता पालिकेने निविदा मागवल्या होत्या. परंतु, पहिल्या निविदेला आवश्यक प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा निविदा काढली. निविदेत कंत्राटदाराने २१७ रुपये प्रति लस असा दर दिला असून पुढील प्रक्रिया सुरू असल्याचे
सूत्रांनी सांगितले. सरकारने येत्या १० ते १५ दिवसांत नवीन दरकरार केले नाहीत, तर १३७ रुपयांना मिळणारी लस पालिकेला २१७ रुपये प्रतिलस दराने खरेदी करावी लागणार आहे.

Web Title: The scarcity of the anti-regime in the municipality hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.