संजय  घरतच्या पत्नीच्या नावे कोट्यवधींची जमीन, सामाजिक कार्यकर्त्याने केली होती तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:55 AM2018-06-15T00:55:03+5:302018-06-15T00:55:03+5:30

कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ता सुलेख डॉन यांनी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांची मालमत्ता व दायित्व विवरण पत्र तपासणी करण्याची मागणी १९ जुलै २०१६ रोजी पालिका प्रशासनाकडे केली होती.

Sanjay Gharat corruption news | संजय  घरतच्या पत्नीच्या नावे कोट्यवधींची जमीन, सामाजिक कार्यकर्त्याने केली होती तक्रार

संजय  घरतच्या पत्नीच्या नावे कोट्यवधींची जमीन, सामाजिक कार्यकर्त्याने केली होती तक्रार

Next

कल्याण - कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ता सुलेख डॉन यांनी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांची मालमत्ता व दायित्व विवरण पत्र तपासणी करण्याची मागणी १९ जुलै २०१६ रोजी पालिका प्रशासनाकडे केली होती. डॉन यांनी लाचखोर संजय घरत यांच्या पत्नीच्या नावे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मौजे केळवण येथे १०५२ गुंठे जमीन व रिव्हर रिधम रिसोर्ट तर भिवंडी तालुक्यातील अकलोली येथे २९ गुंठे जमीन असल्याबाबतचा आरोप करत सबंधित जमिनीचे कागदपत्रे व त्याचा तपशील महापालिका प्रशासनाला सादर करत सदर भूखंडाचा व रिसोर्ट चा विविरण पत्रात समावेश नसल्यास सदर बाब उत्पन्नापेक्षा अधिकची संपत्ती असल्याने त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी होण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडे पाठवण्याची मागणी केली होती.

Web Title: Sanjay Gharat corruption news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.