श्वसनाच्या रुग्णांमध्ये 40 टक्के वाढ, टॉवर संस्कृतीमध्ये उंचावर राहणा-यांना होतो सर्वाधिक त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 04:08 AM2017-10-22T04:08:20+5:302017-10-22T04:08:32+5:30

दिवाळीत उडवण्यात येणा-या फटाक्यांमधील विषारी घटकांमुळे श्वसनाच्या विकारांत व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची वाढ झाली असून ही वाढ सुमारे ३० ते ४० टक्के असल्याची माहिती श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. संगीता चेकर यांनी दिली.

The respiratory disease is 40% higher and the highest temperature in the culture culture is higher | श्वसनाच्या रुग्णांमध्ये 40 टक्के वाढ, टॉवर संस्कृतीमध्ये उंचावर राहणा-यांना होतो सर्वाधिक त्रास

श्वसनाच्या रुग्णांमध्ये 40 टक्के वाढ, टॉवर संस्कृतीमध्ये उंचावर राहणा-यांना होतो सर्वाधिक त्रास

Next

राजू काळे 
भाईंदर : दिवाळीत उडवण्यात येणा-या फटाक्यांमधील विषारी घटकांमुळे श्वसनाच्या विकारांत व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची वाढ झाली असून ही वाढ सुमारे ३० ते ४० टक्के असल्याची माहिती श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. संगीता चेकर यांनी दिली.
दिवाळीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली एनसीआरमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली होती व त्यांनतर महाराष्ट्रात सुद्धा निवासी संकुलामध्ये फटाके विक्रीला न्यायालयाने बंदी घातली होती. तरीही लक्ष्मी पूजनाच्या व पाडव्याच्या आतषबाजीनंतर मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील वायू प्रदूषणात मोठी भर पडली आहे. या महानगरांमधील हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट पातळीपर्यंत घसरली आहे. दिल्लीमध्ये गेल्यावर्षी दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुराची एवढी गडद चादर पसरली की तेथील शाळांना सुटी देणे भाग झाले होते. फटाके फोडल्यानंतर त्यातून सल्फरडाय आॅक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बनडाय आॅक्साईड आणि नायट्रेस गॅसेस बाहेर पडतात. त्याचा सर्वाधिक त्रास अस्थमाच्या रुग्णांना होतो. लहान मुले, वृद्ध यांना श्वसनाचे आजार होतात.
दिवाळीच्या दिवसांत व त्यानंतर दोन दिवसांत श्वसनाच्या विकारांचे ३० ते ४० टक्के नवे रूग्ण येतात. ज्यांना पूर्वी कधीही अस्थमा किंवा श्वसनचा त्रास नव्हता. लहान मुलांची फुफुसे छोटी असल्याने त्यांना फटाक्यांच्या धुराचा अधिक त्रास होतो. याविषयी अधिक माहिती देताना डॉ. चेकर यांनी सांगितले की, फटाक्यांमधील विषारी घटक असतात. ती धूराच्या स्वरुपात हवेत बराच काळ राहतात. त्यामुळे दिवाळीनंतर श्वसनाच्या व अस्थमाच्या पेशंटमध्ये वाढ होते.
मुंबई व ठाणे या शहरांचा विचार करता काळाच्या ओघात येथील चाळ संस्कृती नष्ट होऊन उंचच उंच टॉवर संस्कृती उदयास आली आहे. या उंच इमारतींमध्ये राहणाºयांना फटाक्यांच्या धुराचा अधिक त्रास होतो. कारण फटाक्यांमुळे हवेत सोडले जाणारे विषारी घटक जमिनीपासून ५०० ते हजार फुटावर तरंगत राहतात. त्यामुळे टॉवरमधील ज्येष्ठ तसेच लहान मुलांना श्वसनाचा त्रास होतो.
>मालाडमध्ये सर्वाधिक वायू प्रदूषण
केंद्र सरकारच्या ‘सफर’ या वायू प्रदूषण मोजणाºया संस्थेच्या या वर्षीच्या अहवालानुसार मुंबई, पुणे, नवी मुंबई या शहरांचे प्रदूषण कमालीचे वाढले असून प्रदूषित वायूंची तसेच ‘पर्टिक्युलेट मॅटर’ म्हणजेच घनरूप दूषित कणांची उपस्थिती धोक्याच्या पातळीवर दाखवली आहे. सफरच्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड भागात शहरातील सर्वाधिक वायू प्रदूषण आहे. या उपनगरातील हवेचा दर्जा केवळ खालवलाच नसून घातक पातळीपर्यंत पोहोचला आहे. आधीच वायूप्रदूषण अधिक असलेल्या मुंबईत दिवाळीच्या दिवसांत अस्थमा रूग्णांना राहणे मुश्कील होते.

Web Title: The respiratory disease is 40% higher and the highest temperature in the culture culture is higher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.