स्व. रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी डोंबिवलीकरांची गर्दी, अजय जडेजा-दिलीप वेंगसरकरांचीही उपस्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 02:55 PM2018-02-03T14:55:30+5:302018-02-03T15:09:15+5:30

क्रिकेटपटू अजय जडेजा, जेष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि समालोचक द्वारकानाथ संझगिरी यांची उपस्थिती 

Ratanbua Patil Smriti Cup tournament final match | स्व. रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी डोंबिवलीकरांची गर्दी, अजय जडेजा-दिलीप वेंगसरकरांचीही उपस्थिती 

स्व. रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी डोंबिवलीकरांची गर्दी, अजय जडेजा-दिलीप वेंगसरकरांचीही उपस्थिती 

Next

डोंबिवली - मुंबई , ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील एकमेव प्रसिद्ध आणि भव्यदिव्य स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2018 भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा शुक्रवारी (2 फेब्रुवारी) पडली. 24 जानेवारीला या स्पर्धेला सुरुवात झाली होती.  शुक्रवारी या स्पर्धेचा अंतिम सामना पार पाडला. अंतिम सामना पाहण्यासाठी डोंबिवलीकरांची तोबा गर्दी झाली होती. स्पर्धेत  ४८ ग्रामीण संघ सहभागी झाले होते तर २४ शहरी संघ ,कल्याण रायगड ग्रामीण 12 संघ सहभागी झाले. ग्रामीण विभागात सोनारपाडा संघाचा विजय झाला. शहरी विभागात भार्गव इलेव्हन संघाचा विजय झाला. कल्याण रायगड गटात धानसर संघ विजय झाला. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज बाळा बोराडे(नवपाडा), उत्कृष्ट फलंदाज रुपेश (नवपाडा), उत्कृष्ट श्रेत्ररक्षक रवी अलिमकर(खर्डी), मॅन ऑफ द सिरीज ग्रामीण जित भोईर (वाकलन), आकाश तारेकर( शहरी) यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेत लाखोंची बक्षीसे ठेवण्यात आली होती.

अंतिम सामना पाहण्यासाठी प्रसिद्ध क्रिकेटपटू अजय जडेजा, जेष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, समालोचक द्वारकानाथ संझगिरी, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण,शिवसेना उपनेते अनंत तरे उपस्थित होते. स्पर्धेचे यशस्वी आयोजन माजी आमदार रमेश दादा पाटील, मनसे नेते राजू पाटील, कल्याण ग्रामीण क्रिकेट असोशिएशन अध्यक्ष विनोद पाटील,विजय पाटील आणि जय दुर्गा माता क्रिकेट संघ,काटई यांच्या माध्यमातून करण्यात आले. स्व

र्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक टेनिस  क्रिकेट स्पर्धा म्हणजे क्रिकेटची पंढरी-द्वारकानाथ संझगिरी, समालोचक राजू पाटील , त्यांचे बंधू आणि सहकारी मंडळींनी नवीन उदयोन्मुख क्रिकेटर घडविण्याचा वसा उचलला आहे त्यांनी ही स्पर्धा आता वानखेडे स्टेडियम वर भरवावी - दिलीप वेंगसकर ,जेष्ठ क्रिकेटपटू

टेनिस-क्रिकेट मधूनच खरे क्रिकेटर खेळाडू घडत असतात. मी स्वतः टेनिस क्रिकेट खेळून पुढे आलो त्यामुळे आयोजक अत्यंत महत्त्वाचं कार्य करत करत आहेत याची प्रचिती आज आली - अजय जडेजा.

Web Title: Ratanbua Patil Smriti Cup tournament final match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.