मतदानात पावसाचा नोटा, मीरा-भार्इंदरमध्ये नवमतदारांचा उत्साह : प्रभाग पद्धतीने वाढवला गोंधळ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 06:53 AM2017-08-21T06:53:34+5:302017-08-21T06:53:40+5:30

 Rainy notes in voting, enthusiasm of new voters in Mira-Bhinder: | मतदानात पावसाचा नोटा, मीरा-भार्इंदरमध्ये नवमतदारांचा उत्साह : प्रभाग पद्धतीने वाढवला गोंधळ  

मतदानात पावसाचा नोटा, मीरा-भार्इंदरमध्ये नवमतदारांचा उत्साह : प्रभाग पद्धतीने वाढवला गोंधळ  

googlenewsNext

मीरा रोड : सतत कोसळणारा पाऊस, ढगाळ वातावरण आणि रविवारच्या सुट्टीमुळे मीरा-भार्इंदरच्या मतदानाला फटका बसला. यावेळी आधीपासूनच भरपूर जागृती करूनही मतदानाची ४७ टक्क्यांची सरासरीच कशीबशी गाठली गेली. गेल्यावेळेपक्षा मतदान साधारण एक टक्क्याने कमी झाले, असा प्राथमिक अंदाज आहे. पाऊस नसता किंवा त्याचे प्रमाण कमी असते तरी फरक पडला असता, असे मत निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मांडले.
या परिस्थितीतही नवमतदारांनी उत्साहाने सहभागी होत आपला हक्क बजावला. चार वॉर्डांचा एक प्रभाग झाल्याने मतदान केंद्र शोधणे, यादीतील नाव शोधण्यात मतदारांचा गोंधळ उडाल्याचे दिसत होते. राजकीय पक्षातील संघर्ष, तणातणीचा परिणाम काही ठिकाणी दिसून आला, पण तेवढ्यापुरताच.
ग्रामीण भाग आणि झोपडपट्टी परिसरात सकाळपासूनच चांगले मतदान झाले. दुपारनंतर शहरी भागातील मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली. पावसातही नवमतदार आणि तरुणांनी मोठ्या उत्साहात मतदान केले. वृध्द, अपंगांनीही मतदानाचा हक्क आवर्जून बजावला.
चार उमेदवारांना मतदान करायचे असल्याने आणि त्याशिवाय मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नसल्याने ठिकठिकाणी मतदारांचा गोंधळ उडालेला दिसत होता. काही ठिकाणी उमेदवारांची संख्या कमी असल्याने चार स्वतंत्र मतदान यंत्रे नव्हती. अनेक मतदारांनी तीन ठिकाणीच बटन दाबल्यावर केंद्रातील मदतनीस त्यांना समजावून सांगत होते. अधिक उमेदवार असलेल्या प्रभागात मतदारांचा आपल्या पसंतीच्या उमेदवाराची नावे किंवा चिन्ह शोधण्यात वेळ जात असल्याने कर्मचारी त्यांना घाई करत होते. सकाळपासून पावासाचा जोर वाढत असल्याने मतदार बाहेर पडतील की नाही, या चिंतेने उमेदवार व राजकीय पक्ष धास्तावले होते. दुपारपर्यंत अपेक्षित आकडा गाठला न गेल्याने मतदारांना बाहेर काढण्यासाठी फोन करणे, घरोघर जाऊन आग्रह करणे, सोशल मीडियातून मेसेज पाठवणे असे मार्ग अवलंबले गेले. मतदान केंद्रापर्यंत मतदारांच्या ने-आणीसाठी वाहने पुरवण्यावर आचारसंहितेनुसार बंदी आहे. तरीही नंतर पक्षाचे कार्यकर्ते आणि उमेदवारांनी वाहने तैनात केली होती. पाऊस असल्याने बहुतांश मतदारांनीही या ‘सेवेचा’ लाभ घेतला.

छायाचित्रणाला फाटा?
मतदान केंद्रांवर छायाचित्रण करणारे पालिकेचे कॅमेरामनच अनेक ठिकाणी नव्हते. त्यामुळे केंद्राच्या परिसरात कोण येते आहे, कोण जाते आहे, कार्यकर्ते चिन्हासह घुटमळत आहेत का, याचे छायाचित्रणच होत नव्हते. काही ठिकाणी उमेदवार परस्परांवर आरोप करत होते. त्यातून काही मतदानकेंद्रांवर उमेदवार व पोलीस कर्मचाºयात खटके उडाले. प्रसंगी जोरदार बाचाबाची आणि आरोप- प्रत्यारोप झाले. परंतु छायाचित्रण करणारेच कोणी नसल्याने या घटनांना पुरावाच तयार झाला नाही.

मेहतांना वेगळा न्याय?

प्रभाग १२ मध्ये आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन स्क्वेअर शाळेत मतदानाची वेळ संपण्याआधी सर्व उमेदवारांना बाहेर काढण्यात आले. परंतु वेळ संपल्यावरही भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांना मतदान केंद्राच्या आवारात पोलिसांनी प्रवेश दिल्याने अन्य उमेदवार व कार्यकर्ते संतप्त झाले.
पोलिसांच्या बोटचेपेपणाचा निषेध करत मोठी गर्दी झाल्याने सौम्य लाठीमार करून गर्दीला पांगवण्यात आले. मेहतांच्या शाळेत मतदान केंद्र ठेवलेच कशासाठी? असा प्रश्न अन्य उमेदवारांनी केला.

तयारी मतमोजणीची
च्सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून पाच ठिकाणी आठ केंद्रांवर मतमोजणीला सुरूवात होईल. यातील तीन ठिकाणी दोन मोजणी केंद्रे आहेत.
च्साधारणत: तासाभरात पहिला निकाल हाती येईल आणि दुपारी अडीच ते तीनपर्यंत सर्व मोजणी पूर्ण होईल, असा अंदाज आहे.

अउमेदवारांची माहिती
प्रत्येक मतदान केंद्रात फलकावर रिंगणातील उमेदवारांचे शिक्षण, गुन्हे, संपत्तीची स्थिती यांची माहिती लावलेली होती. काही मतदार ते वाचताना दिसत होते.

माझी निशाणी...
मतदान केंद्र परिसरात येणाºया मतदारांना काही ठिकाणी उमेदवार आपली निशाणी सांगत होते. मलाच मतदान करा, असा आग्रह ते आणि त्यांचे समर्थक करत होते. अनेक ठिकाणी तर भर पावसातही सर्वपक्षीय उमेदवार कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उभे राहून मतदारराजाला विनवणी करत होते. उमेदवारांत जेथे खेळीमेळीचे वातावरण होते, तेथे प्रसंगी विनोद झडत हास्याच्या लकेरीही उमटत होत्या.

Web Title:  Rainy notes in voting, enthusiasm of new voters in Mira-Bhinder:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.