पेण ते रोहा आजपासून तीन दिवस पॉवर ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 04:30 AM2019-05-03T04:30:24+5:302019-05-03T04:30:34+5:30

मध्य रेल्वे मार्गावर पेण ते रोहादरम्यान तीन दिवस ब्लॉक घेण्यात येईल.

Power block from Pen to Roha for three days from today | पेण ते रोहा आजपासून तीन दिवस पॉवर ब्लॉक

पेण ते रोहा आजपासून तीन दिवस पॉवर ब्लॉक

googlenewsNext

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर पेण ते रोहादरम्यान तीन दिवस ब्लॉक घेण्यात येईल. ३ ते ५ मेदरम्यान पॉवर ब्लॉक घेऊन पेण, कासूदरम्यान रोड ओव्हर ब्रिजसाठी गर्डर टाकण्यात येतील. यासाठी दुपारी ब्लॉक घेण्यात येईल.

३ मे दुपारी २.३० ते ४.३०पर्यंत, ४ मे रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ तर, ५ मे रोजी दुपारी २.४० ते ४.४०पर्यंत पॉवर ब्लॉक असेल. यामुळे ३ मे रोजी ६१०१२ क्रमांकाची रोहा ते दिवा मेमू ४.१५ऐवजी ४.३५ला सुटेल. ४ मे रोजी दिवा ते रोहा गाडी क्रमांक ६१०११ ही सोमटने, रोहादरम्यान तर, रोहा ते दिवा ६१०१२ क्रमांकाची गाडी रोहा, सोमटनदरम्यान रद्द केली आहे. ५ मे रोजी ६१०१२ क्रमांकाची रोहा ते दिवा मेमू ४.१५ऐवजी ४.५० ला सुटेल.

Web Title: Power block from Pen to Roha for three days from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे