पोलिसांनी महिलांनाच विचारले अड्डे दाखवा, राष्ट्रवादीकडून आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 03:19 AM2018-03-03T03:19:02+5:302018-03-03T03:19:02+5:30

भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुगार व मटका तेजीत अशी बातमी लोकमतने प्रकाशीत केल्यानंतर येथील महिलांनी त्या विरोधात वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर जाधव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असली तरी पोलिसांनी महिलांनाच जुगाराचे अड्डे दाखवा अशी विचारणा केली आहे.

Police show women to show support, NCP warns of agitation | पोलिसांनी महिलांनाच विचारले अड्डे दाखवा, राष्ट्रवादीकडून आंदोलनाचा इशारा

पोलिसांनी महिलांनाच विचारले अड्डे दाखवा, राष्ट्रवादीकडून आंदोलनाचा इशारा

Next

मुंबई : भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुगार व मटका तेजीत अशी बातमी लोकमतने प्रकाशीत केल्यानंतर येथील महिलांनी त्या विरोधात वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर जाधव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असली तरी पोलिसांनी महिलांनाच जुगाराचे अड्डे दाखवा अशी विचारणा केली आहे.
येथील बाबला कंपाऊंड, भारत कंपाऊंड, जब्बार कंपाऊंड व चव्हाण कॉलनी या भागामध्ये जुगार व मटक्याच्या धंदे कुणाच्या पाठबळाने चालतात अशी विचारणा राष्टÑवादी महिला कॉग्रेस पार्टीकडून करण्यात आली आहे. याद्वारे प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात अन्यथा आंदोलन करु असे अशा इशारा स्वाती कांबळे व शबीना अन्सारी या महिलांनी दिला आहे. दरम्यान, शहरातील संवेदना सद्भावना प्रेरणा सामाजिक संस्थेने डीसीपी मनोज पाटील तसेच मुख्यमंत्री कार्यालयाला पत्राद्वारे शहरातील जुगार मटक्याची तक्रार केली आहे. महिलांनी प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी केली आहेत.
>प्रतिबंधक अधिनियमानुसार कारवाई करा
मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ नुसार या भागामध्ये यापूर्वी कारवाई केल असल्याची माहिती पोलीस नाईक रवी पाटील यांनी दिली आहे. जुगार व मटका प्रकरणी आतापर्यंत अन्नू व युसूफ यांच्यावर कारवाई झाली आहे. दरम्यान, गॅँबलिंगचे स्टिंग आॅपरेशनची क्लिप वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोर जाधव व एसीपी मुजावर यांना या पूर्वीच वॉट्सअ‍ॅपद्वारे पाठविली आहे.

Web Title: Police show women to show support, NCP warns of agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.