police found ammonia powder near kolshet creek of thane | ठाण्यात सापडली अमोनियाची पावडर; घातपाताच्या संशयानं पोलिसांची तपासणी सुरू
ठाण्यात सापडली अमोनियाची पावडर; घातपाताच्या संशयानं पोलिसांची तपासणी सुरू

ठाणे: कोलशेत खाडी परिसरात काल रात्री साडेदहाच्या सुमारास कापुरबावडी पोलिसांना अमोनियाची सापडली. यानंतर पोलिसांनी परिसरात चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी खाडी परिसरात चार-पाचजण फिरत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या, अशी माहिती पोलिसांना दिली. ही पावडर टाकणारे कोण होते, याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपयुक्त अविनाश अम्बुरे यांनी दिली. घातपात घडवून आणण्याच्या संशयानं अमोनियाची पावडर आणण्यात आली होती का, या दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू आहे. ठाणे आणि भिवंडीच्या खाडी किनारी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 


Web Title: police found ammonia powder near kolshet creek of thane
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.