वनजमिनीवर उभारलेली चाळ जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 06:31 AM2018-05-09T06:31:37+5:302018-05-09T06:31:37+5:30

कौसा येथील वनजमिनीवर बेकायदेशीरपणे उभारलेली चाळ वन कर्मचाऱ्यांनी जमिनदोस्त केली. चाळीतील काही खोल्यांची भूखंड माफियांनी अवैध विक्रीही केली होती.

Plunge the plank set on the forest | वनजमिनीवर उभारलेली चाळ जमीनदोस्त

वनजमिनीवर उभारलेली चाळ जमीनदोस्त

Next

ठाणे - कौसा येथील वनजमिनीवर बेकायदेशीरपणे उभारलेली चाळ वन कर्मचाऱ्यांनी जमिनदोस्त केली. चाळीतील काही खोल्यांची भूखंड माफियांनी अवैध विक्रीही केली होती.
कौसा येथील डोंगरालगतच्या वनजमिनीवर भूखंड माफियांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. शासनाची जमीन बळकावून अवैध बांधकामे करायची आणि गोरगरिबांना ती विकण्याचा गोरखधंदा भूखंड माफिया करतात. या भूखंड माफियांनी कौसातील वनजमिनीवर आठ दिवसांपूर्वी १३ खोल्यांची चाळ उभारली. मध्यंतरी २८ एप्रिल ते १ मेपर्यंत सलग चार दिवस सार्वजनिक सुटी होती. या काळात भूखंड माफियांनी वनजमिन बळकावून चाळीचे बांधकाम सुरू केले. रात्रीच्या वेळी बांधकाम करून भूखंड माफियांनी तळमजल्यावर सात आणि पहिल्या मजल्यावर सहा खोल्या बांधल्या. १३ पैकी एक-दोन खोल्या वगळल्या तर उर्वरित सर्व खोल्या अतिक्रमकांनी गोरगरिबांना विकल्या होत्या. त्यांची विक्री प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपयांना करण्यात आली होती. त्या ज्यांनी विकत घेतल्या त्यांनी त्यांचे साहित्य खोल्यांमध्ये आणण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी वन कर्मचाºयांना त्याचा सुगावा लागला.
अतिक्रमण हटविण्यासाठी उपवनसंरक्षक रामगावकर, सहायक वनसंरक्षक संजय लचके यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने हालचाली करण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकासह मुंब्रा पोलिसांनीही तातडीने पुढाकार घेऊन चाळ जमिनदोस्त केली. अतिक्रमण जमिनदोस्त करण्यापूर्वी पथकाने लोकांना त्यांचे साहित्य खोल्यांमधून काढण्यास थोडा अवधी दिला. वनअधिकारी डी.सी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक प्रवीण आव्हाड, वनपाल अर्जुन निचिते, प्रभाकर कुडाळकर, नारायण भंगारे आदींनी ही कारवाई केली.

२५0 झोपड्या हटविल्या

दिघा परिसरातील इलठाण पाड्यामध्ये वन अधिकाºयांनी ३ मे रोजी कारवाई करून तब्बल २५0 झोपड्यांचे अतिक्रमण हटविले. या भागातील वनजमिनीवर भूखंड माफियांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते.

Web Title: Plunge the plank set on the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.