सीडीआरप्रकरणी दिल्लीतून गुप्तहेर पंकज तिवारीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 05:54 AM2018-05-18T05:54:04+5:302018-05-18T05:54:04+5:30

बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणी ठाणे पोलिसांनी बुधवारी दिल्लीतील पंकज तिवारी या खासगी गुप्तहेरास अटक केली. तिवारी याच्यावर यापूर्वी केंद्रीय मंत्री अरुण जेटलींचे सीडीआर काढल्याचा आरोप होता.

Pankaj Tiwari arrested from Delhi under CDR | सीडीआरप्रकरणी दिल्लीतून गुप्तहेर पंकज तिवारीला अटक

सीडीआरप्रकरणी दिल्लीतून गुप्तहेर पंकज तिवारीला अटक

Next

- राजू ओढे 
ठाणे : बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणी ठाणे पोलिसांनी बुधवारी दिल्लीतील पंकज तिवारी या खासगी गुप्तहेरास अटक केली. तिवारी याच्यावर यापूर्वी केंद्रीय मंत्री अरुण जेटलींचे सीडीआर काढल्याचा आरोप होता.
ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने मोबाइल फोनचे सीडीआर बेकायदेशीरपणे काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जानेवारीमध्ये केला होता. या प्रकरणामध्ये देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांच्यासह १५ आरोपींना अटक केली. गुप्तहेर कीर्तेश कवी याला यापूर्वीच अटक केली होती. त्याच्या मदतीने गुप्तहेर लक्ष्मण ठाकूर याने काही सीडीआर मिळवल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, ११ मे रोजी त्यालाही अटक करण्यात आली. तिवारी हा या प्रकरणी अटक केलेला अकरावा खासगी गुप्तहेर आहे. त्याच्या अटकेने एकूण आरोपींची संख्या १५ झाली आहे. या आरोपींमध्ये यवतमाळ येथील एका पोलीस शिपायाचाही समावेश आहे.
पोलीस कोठडीदरम्यान त्याच्याकडून पोलिसांना दिल्ली येथील खासगी गुप्तहेर पंकज तिवारी याची माहिती मिळाली. लक्ष्मण ठाकूरने पंकज तिवारीकडून काही सीडीआर मिळवल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी दिल्लीतून पंकज तिवारीला अटक केली. गुरुवारी दिल्ली येथील कडकड्डुमा न्यायालयाकडून पोलिसांनी त्याची प्रवासी कोठडी (ट्रान्झिट कस्टडी) घेतली. शुक्रवारी ठाण्याच्या न्यायालयासमोर हजर करून त्याची रीतसर पोलीस कोठडी घेतली जाईल.
>ठाकूरच्या कोठडीत वाढ
११ मे रोजी ठाणे पोलिसांनी अटक केलेला सांताक्रूझ येथील गुप्तहेर लक्ष्मण ठाकूर याची पोलीस कोठडी न्यायालयाने १९ मेपर्यंत वाढवली.

Web Title: Pankaj Tiwari arrested from Delhi under CDR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग