एक व्यक्ती तीन पदांमुळे सेनेत नाराजी, मोरे यांची पत्नी महापौरपदाच्या स्पर्धेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 03:46 AM2017-10-25T03:46:09+5:302017-10-25T03:46:11+5:30

डोंबिवली : शिवसेनेच्या शहरप्रमुखपदावर असतानाही भाजपाकडून तोंडाला काळे फासले जात असताना तो विषय हसण्यावर नेणारे भाऊ चौधरी यांना थोड्या काळानंतर हटवण्यात आले असले, तरी ज्या राजेश मोरे यांच्याकडे ादीच दोन महत्त्वाची पदे होती

One person for the three positions, Narayi and More's wife, in the battle of the mayoral post | एक व्यक्ती तीन पदांमुळे सेनेत नाराजी, मोरे यांची पत्नी महापौरपदाच्या स्पर्धेत

एक व्यक्ती तीन पदांमुळे सेनेत नाराजी, मोरे यांची पत्नी महापौरपदाच्या स्पर्धेत

Next

डोंबिवली : शिवसेनेच्या शहरप्रमुखपदावर असतानाही भाजपाकडून तोंडाला काळे फासले जात असताना तो विषय हसण्यावर नेणारे भाऊ चौधरी यांना थोड्या काळानंतर हटवण्यात आले असले, तरी ज्या राजेश मोरे यांच्याकडे ादीच दोन महत्त्वाची पदे होती, त्यांना तिसरे पद दिल्याने शिवसेनेतील नाराजी बाहेर आली आहे. त्यातच पुढील वर्षी होणा-या महापौरपदाच्या निवडणुकीत मोरे यांच्या पत्नी भारती यांचे नाव प्रमुख दावेदारांत गेतले जात असल्याने आता त्यांना चौथे पदही मिळणार म्हणूनही अस्वस्थता आहे.
पक्षात बाहेरून आलेल्यांवर पदांची खैरात केली जात असल्याने निष्ठावंत म्हणून काय सभेत फक्त गौरव करून घ्यायचा का, असा प्रश्न कट्टर शिवसैनिक करत आहेत. त्यामुळे खांदेपालट करताना नव्याने उफाळून आलेली ही नाराजी दूर करण्याचे आव्हान जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांना पार पाडावे लागणार आहे.
राजेश मोरे हे आधी राष्ट्रवादीत होते. त्यांचे राजकीय गुरु पुंडलिक म्हात्रे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. शिवसेनेची वाट धरली. त्यांना उप जिल्हाप्रमुखपद दिले. त्यांचा मुलगा दीपेश यांना दोन वेळा नगरसेवकपद मिळाले. दीपेश यांना पक्षाने युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवली. स्थायी समितीचे सभापतीपद दिले. ते महापौरपदासाठी प्रयत्नशील आहेत. म्हात्रे यांच्या गटाचे कट्टर समर्थक असलेले मोरे आणि त्यांची पत्नी भारती निवडून आले आहेत. पालिकेत सभागृह नेतेपद कोणी घेऊ इच्छीत नव्हते, तेव्हा मोरे यांनी ते पद स्वीकारले, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. पुढे स्थायी समितीचे सदस्यपदही मोरे यांना मिळाले. आता डोंबिवली शिवसेना शहर प्रमुखपदाची जबाबदारी त्यांना सोपवली आहे. मोरे यांंच्या पत्नी भारती यांचे नाव महापौरपदासाठी चर्चेत आहे. त्यांना महापौरपद मिळाले, तर पदांचा आकडा चारवर जाऊ शकतो. त्यामुळेच पक्षात खदखद आहे.
>...म्हणे तारीख चुकीची पडली!
मोरे यांना शहर प्रमुखपदाचे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पत्रावर मे महिन्याची तारीख आहे. त्यामुळे तेव्हाच चौधरी यांना हटवून मोरे यांना पद देण्याचे ठरले होते, फक्त त्याची अंमलबजावणी आता झाल्याची चर्चा आहे. त्यावर तारीख चुकीची पडल्याचा खुलासा शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे. शहरप्रमुखपद दिल्याने पक्षांतर्गत नाराजीचा सूर असल्याबद्दल छेडले असता, मोरे यांनी मी पद मागायला गेलो नव्हतो. पक्षाने मला जबाबदारी दिली आहे, ती योग्य प्रकारे चोखपणे पार पाडणार. त्यामुळे नाराजीचा प्रश्न येतच नाही, अशी भूमिका घेतली आहे. कोकणवासीयांच्या नाराजीबद्दल बोलताना मोरे यांच्या समर्थकांनी यापूर्वी कोकणाला शहरप्रमुखपद दिले तरी त्यांना साधे नगरसेवकपद मिळवता आले नाही, असा टोला चौधरी यांना लगावला. त्यामुळेच आगरी समाजाला पद दिल्याचा त्यांचा दावा आहे. भाऊ चौधरी यांना पदावरुन हटविले नसून त्यांनी स्वत:हून प्हे पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती, असेही स्पष्टीकरण नव्या गटातर्फे देण्यात येत आहे. पक्षातील या नाराजीवर मात करण्याचे आव्हान मोरे यांच्यासमोर आहे.
>कोकणावर अन्याय करत आगरी समाजाला झुकते माप
डोंबिवलीत कोकणातून आलेल्यांची संख्या मोठी आहे आणि कोकण हा शिवसेनेचा हुकमी एक्का मानला जातो. शहर प्रमुखपदाच्या स्पर्धेतून आता कोकण बाद झाले असून त्याची जागा आगरी कार्डाने घेतली आहे. भाजपाने मात्र कोकणाचा चेहरा जपला आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे कोकणातील आहेत. त्याचबरोबर नंदू परब हेही कोकणातील आहेत. पुंडलिक म्हात्रे गटाविरोधात शिवसेनेचा एक गट आहे. त्या गटाला मोरे यांना शहरप्रमुखपद देणे रुचलेले नाही. त्या गटाची नाराजी सध्या उघडपणे दिसून येत नसली, तरी ही नाराजी योग्यवेळी, योग्य व्यासपीठावर व्यक्त करण्याची त्यांची परंपरा आहे. यात डोंबिवलीच्या राजकारणात पक्षीय मतभेद विसरून एकत्र येणारे आगरी कार्ड मात्र खुशीत आहे.

Web Title: One person for the three positions, Narayi and More's wife, in the battle of the mayoral post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.